
पनवेल, दि.9 (संजय कदम) ः परिमंडळ 2 अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याने 100 दिवसाची क्षेत्रिय कार्यालयीन सुधारणा मोहिम अंतर्गत सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी द्वितीय क्रमांकाचे गुणांकन देवून त्यांचे कौतुक केले आहे. तर प्रथम गुणांकन परिमंडळ 1 येथील एपीएमसी मार्केट येथील पोलीस ठाण्याला मिळाले आहे.
पनवेल तालुका पोलिसांनी व त्या अंतर्गत वपोनि गजानन घाडगे यांच्यासह त्यांच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी गेल्या शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत उल्लेखनिय केलेल्या कामगिरीची दखल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी घेवून त्यांना द्वितीय क्रमांकाचे गुणांकन देण्यात आले आहे. याबद्दल पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी एक वेगळाच प्रकारचा जल्लोष करून आपल्याला मिळालेल्या गुणांकनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल वपोनि गजानन घाडगे व त्यांच्या सर्व टिमचे कौतुक होत आहे.

Be First to Comment