
मरावे परी, नेत्र रुपी उरावे, या उक्तीनुसार अशोक जोशी यानी नेत्रदान करून पुण्यकर्म केले
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहरातील श्री समर्थ नगर येथे राहणाऱ्या अशोक जगन्नाथ जोशी वय 85 यांचे 6 मे 2025 रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा आपले चिरंजीव अमित जोशी, कन्या अर्चना आणि जावई विवेक पिटकर यांना बोलून दाखवल्याची माहिती डॉ. रणजीत मोहिते यांना समजली. अशोक जोशी यांचे अंतिम इच्छेनुसार डॉ रणजीत मोहिते यांनी नेत्रदान प्रकिया पूर्ण करण्यासाठी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अल्पेश शहा यांच्याकडे जबाबदारी सोपवली. सर्व तांत्रिक निकष पूर्ण केल्यानंतर लक्ष्मी आय हॉस्पीटल – पनवेल येथील नेत्रतज्ञ डॉ रणजीत मोहिते यांच्या श्री पार्वती हॉस्पिटल, खोपोली येथे आले आणि त्यांनी सर्वांच्या सहकार्याने नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली.
दिवंगत अशोक जगन्नाथ जोशी यांची नेत्रदानाची अंतिम इच्छा आपण पूर्ण करू शकलो याचे मनस्वी समाधान लाभल्याची भावना अमित जोशी आणि अर्चना पिटकर यांनी या निमित्ताने व्यक्त केली.





Be First to Comment