
खोपोली : प्रतिनिधी
मान्सून पूर्व तयारीचे अनुषंगाने खालापूर तालुक्यातील दरड प्रवण गावांची स्थळ पाहणी करणेकरीता कर्जतचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी खोपोली शहरातील काजूवाडी, सुभाष नगर, तसेच खालापूर तालुक्यातील बीड खुर्द, ताडवाडी या गावांना भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत खालापूर तालुक्याचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता प्रशांत राखाडे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील, पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, वनपाल भगवान दळवी, मंडळ अधिकारी भरत सावंत, संदेश पानसरे, माणिक सानप, खालापूर तालुका पंचायत समितीचे शैलेंद्र तांडेल, उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे यतीराज खांडेकर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, ग्रामसेवक आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
या भेटी दरम्यान गावकरी आणि नागरिकांसोबत उपाययोजना संदर्भात चर्चा करून संबंधित विभागाला तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

Be First to Comment