
प्रतिनिधी सारडे (नागेंद्र म्हात्रे ) आयुष्यात काही तरी कारावस वाटलं तर सत्कर्म करा सत्कर्मा ची फळे ही नेहमीच गोड असतात शुद्ध विचार हे सकारात्मक कृती घडवून आणत असतात आणि उत्तम समाज उपयोगी कार्य करून घेत असतात रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील द्वितीय क्रमाक्र ची ज्ञान देणारी शिक्षण संस्था आहे कमवा आणि शिका स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे संस्थेचे बोध वाक्य आणि सारडे गावातील रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी श्री सुनील केशव पाटील आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले,त्या शाळेप्रति कृतज्ञता जपत माजी विद्यार्थ्यांने शाळेला लेक्चर्स स्टॅण्ड भेट दिला आहे.
उरण तालुक्यातील पूर्व विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन या शाळेने आणले या शाळेने अनेक विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवले,त्यामुळे या शाळेतून कित्येक यशस्वी विद्यार्थी तयार झाले. याच शाळेत शिकणाऱ्या सुनिल केशव पाटील सारडे या विद्यार्थ्यांने सारडे विकास मंचच्या माहितीच्या आधारे या विद्यालयाला उपयुक्त असलेला स्टील लेक्चर स्टँड भेट दिला आहे. सुनिल केशव पाटील हे सध्या नवीन पनवेल पोस्ट ऑफिस मध्ये सिनियर मार्केटींग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात आहेत.सामाजिक कार्यासाठी नेहमींच पुढाकार घेणारे सुनिल पाटील यांनी सारडे विकास मंचच्या सामाजिक कार्यासाठी 8 हजार रुपयांचा निधी दिला होता त्याचा वापर आज विद्यालयाला स्टॅण्ड देण्यासाठी करण्यात आला, या कार्यक्रमास क.भा.पा विद्यालयाचे शिक्षक पुरण पाटील, संजय म्हात्रे, सर अजित पाटील,सर सुयश क्लासेस आवरे चे निवास गावंड, सर सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, सदाबहार दोस्ती ग्रुप चे हरिश्चंद्र म्हात्रे , शिवकुमार म्हात्रे उपस्थित होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ,सौं. पाटील एस. एस. यांनी सुनिल पाटील तसेच सारडे विकास मंच चे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री पुरण पाटील सर यांनी केले.

Be First to Comment