Press "Enter" to skip to content

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌

मुंबई (पंकजकुमार पाटील): पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या, सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व मुंबई विद्यापिठाच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार दि .२६ एप्रिल रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये केले होते. या परिषदेचा विषय‌ होता, ‘व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान’ (Innovation & Research in Business and Modern Technology).

या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहूणे, सावित्रीबाई फूले पुणे विद्यापिठाचे माजी कुलगूरू डॉ. वासूदेव गाडे यांच्या हस्ते, विशेष निमंत्रीत जेष्ठ प्राध्यापक डॉ. संजयकुमार फड व प्राचार्य डॉ. उमाजी मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता झाले. ६० मिनीटांच्या या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहूण्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे‌ शेती, उद्योग व संशोधनांवर वर होत असलेल्या चांगल्या वाईट परिणामांची अत्यंत अभ्यासपूर्ण व चिकित्सक पद्धतिने सहभागी अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली.
त्यांनतर दिड तासाच्या महत्वाच्या दुसऱ्या सत्रात पॅनल डिस्कशनद्वारे निमंत्रीत तज्ञ वक्त्यांनी AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे अर्थीक व कौशल्य विकास, नोकरीच्या संधी, व्यावसायिक नितीमत्ता, आव्हाने व उपाय इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच काहींच्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे दिली. यामध्ये पॉन्डेचेरी येथील पदवीत्तर शासकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. लक्षमनपथी तसेच पूणे येथिल मॉर्डन कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संदीप सानप व आमचे उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर‌ यांचा समावेश होता.

दुपारच्या जेवणानंतरच्या तिसऱ्या सत्रात सहभागी अभ्यासक व पदवीत्तर विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रीम बुद्धिमत्ता, नाविण्यपूर्ण संशोधन इत्यादी विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण आयोजित केले होते. यामध्ये मुंबई व पुणे येथिल विविध महाविद्यालयातून सहभागी झालेल्या निवडक १० प्रतिनीधीना संधी देण्यात आली. त्यांनीदेखील वरील विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन केले. या सत्राचे परिक्षण डॉ. विष्णू भंडारे व डॉ. समिर ठाकूर यांनी केले.

समारोपाच्या शेवटच्या सत्रात प्राचार्य डॉ. उमाजी म्हस्के यांनी सर्व‌ सहभागी वक्ते, अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले व सर्वांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. तसेच परिषद यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व‌ विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सदर राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. उमाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. शशिकांत मुंडे यांच्या नेतृत्वात प्रा. विशाल करंजवकर, प्रा. राधा कनकामल्ला, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व निवडक विद्यार्थ्यानी भरपूर मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.