
नागोठणे गावात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत ; कुत्र्यांनी सतरा जणांना घेतला चावा
नागोठणे : याकूब सय्यद
नागोठणे गावात दिवसाना दिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे त्या भटक्या कुत्र्यांपैकी एक भटका चावलेला कुत्रा त्या कुत्र्याने इतर कुत्र्यांना देखील चावा घेतला आहे त्यामुळे नागोठणे परिसरात ते भटके चावलेले कुत्र्यांची संख्येत वाढ झाली आहे. दिनांक 22 /4 /2025 ते 23/ 4 /2025 रोजी मंगलवार ते बुधवार ह्या दोन दिवसात पिसाळलेले कुत्र्या समोरील वय वृद्ध लहान मुले तरुण मुले हे पदाचारी रस्त्यावरून रस्ताक्रम करत असताना ते भटके पिसाळलेले कुत्रे थेट त्या समोरच्या व्यक्तीवर जीव घेणे हल्ला करीत चावा घेऊन त्या व्यक्तीला खूप मोठी अशी शारीरिक दुखापत पोचविली आहे ही घटना अतिशय चिंताजनक आहे मंगलवार बुधवार या दोन दिवसात १७ लोकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

चावा घेतलेल्या व्यक्तींपैकी त्यात लहान मुले वयोवृद्ध पुरुष तरुण मुले असून संबंधित व्यक्तींना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन त्यांना घायल केले आहे भटके चावलेल्या कुत्र्यांनी ज्या व्यक्तींना चावा घेतला आहे त्या व्यक्तींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करिता घेऊन गेले असता त्यापैकी किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे परंतु जास्त शारीरिक दुखापत झालेल्या रुग्णांना पुढील उपचाराकरिता नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी रायगड जिल्हा आरोग्य केंद्र अलिबाग येथे उपचाराकरिता पाठविले आहे गावात भटक्या चावलेला कुत्र्यांमुळे लहान मुले वयोवृद्ध महिला पुरुष तरुण माणसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्यामुळे घरातून बाहेर पडण्यासाठी दहशतीखाली लोकांना घराच्या बाहेर जावं लागत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था नागोठणे ग्रामपंचायतीने भटके व पिसाळलेले कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीखाली दोन दिवसापासून वावरात असलेले नागोठणेतील तमाम जनतेची सुटका करण्यात यावी अशी नागोठणे गावातील जनतेची शासकीय प्रशासकीय यंत्रणाकडे जोरदार मागणी होत आहे.




Be First to Comment