
लंकारा रिसॉर्ट श्रीनगरचे आमीर भाऊ संकटाच्या वेळी मानवतेचे उदाहरण ठरले ; पर्यटकांसाठी केली जेवण आणि मोफत वाहनांची सोय
श्रीनगरजवळील लंकारा रिसॉर्टच्या परिसरात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशा कठीण प्रसंगी, रिसॉर्टचे मालक आमीर भाऊ यांनी धैर्य आणि करुणेचं मोठं उदाहरण घालून दिलं.
पाहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांमध्ये निर्माण झालेली भीती आणि घबराट लक्षात घेऊन, आमीर भाऊंनी त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मोफत वाहनांची व्यवस्था केली. यासोबतच, प्रभावित लोकांसाठी मोफत भोजन देखील उपलब्ध करून दिलं, ज्यामुळे संकटाच्या वेळी त्यांना आधार मिळाला.
त्यांच्या या नि:स्वार्थ कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. अनेकांनी त्यांच्या धैर्य, दयाळूपणा आणि नेतृत्वगुणांना सलाम केला आहे. सोशल मीडियावर आमीर भाऊंच्या कार्याची जोरदार चर्चा असून, त्यांना खऱ्या अर्थाने “खरा हिरो” म्हटलं जात आहे, ज्यांनी काश्मीरियतचा खरा अर्थ जगाला दाखवून दिला.





Be First to Comment