
पेण, ता. ११ (वार्ताहर) : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी लादलेल्या अन्यायकारक कायद्यामुळे झालेल्या आंदोलनात जवळपास सातशे जण शहीद झाले असून शासन प्रशासन निर्देशनाने शक्तीपीठ शेतकरी आंदोलनाचे नेते व किसान सभेचे राज्यसचिव गिरीश फोंडे यांचे शिक्षक सेवेतून निलंबन केले आहे ते न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही त्यामुळेच त्यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीसह अखिल भारतीय किसान सभेचा स्थापना दिवस असल्याने या अनुषंगाने शक्तीपीठ शेतकरी आंदोलनाचे नेते गिरीश फोंडे यांनी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग करिता संपादित करीत असलेली जमीन तसेच सिंचनाखाली येणाऱ्या जमीनीमुळे लाखो कुटुंब बेघर, निराधार, भूमीहीन होणार आहेत त्यांच्या उपजीविकेचे साधन हिसकावून घेतले जाणार आहे.या प्रकल्पाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा शंभर टक्के विरोध आहे याकरीता शेतकरी नेते गिरीश फोंडे हे लढत असल्याने त्यांचे निलंबन केले गेले ते योग्य नाही त्यामुळे सरकार संवेदनशील दाखवून त्यांचे निलंबन मागे घ्यावे अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे, चंद्रकांत म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, डॉ.प्रा. गोरे, उल्हास पाटील आदि उपस्थित होते.

Be First to Comment