
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील सुप्रसिद्ध अशा अभिनव युवक मित्र मंडळाच्या माध्यमातून विभागातील सर्व आजी-माजी क्रिकेटपट्टूंसाठी पायोनिअर प्रिमियर लिग 2025 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंच्या टी-शर्टचे अनावरण केशवस्मृती पतपेढीचे अध्यक्ष अमित ओझे, मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील व रायगड प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
पायोनिअर विभागात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एकूण 4 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये पायोनिअर किंग कर्णधार अल्पेश पाडावे, पायोनिअर टायगर्स कर्णधार मयुर चिटणीस, पायोनिअर मराठा कर्णधार शैलेश कदम व पायोनिअर पँथर्स कर्णधार राजा चव्हाण असे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूंच्या टी-शर्टचे अनावरण केशवस्मृती पतपेढीचे अध्यक्ष अमित ओझे, मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन पाटील व रायगड प्रेस क्लबचे सल्लागार संजय कदम यांच्या हस्ते व मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत करण्यात आले.

सदर स्पर्धा ही हनुमान जयंतीचे औचित्य साधून 12 एप्रिल रोजी सुकापूर येथील सॉकर सिटी येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. प्रथम पारितोषिक आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक सुंदर चषक, उत्कृष्ट फलंजदा, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि इतर बक्षिसांचे वाटप यावेळी होणार असल्याने ही स्पर्धा मोठी रंगतदार बनणार आहे व अनेक दिग्गज, नावाजलेले खेळाडू या स्पर्धेत खेळणार असल्याने त्यांच्या खेळाची नजाकत सुद्धा उपस्थित प्रेक्षकांसाठी नजराणा ठरणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.





Be First to Comment