
मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील
माजी विश्वविजेता आयर्स येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत रुद्राक्ष पाटीलचे हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे. त्याने यापूर्वी २०२३ मध्ये कैरो येथे झालेल्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. या विजयासह, भारत आता चीनसह संयुक्तपणे पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दोन्ही देशांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. अजून आठ अंतिम सामने खेळायचे आहेत. अमेरिका दोन सुवर्णपदके जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.

पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये चौथ्या स्थानावर राहिलेला अर्जुन बाबुता अंतिम फेरीत पोहोचूनही पुन्हा एकदा पदक जिंकण्यात अपयशी ठरला. बाबुता १४४.९ गुणांसह सातव्या स्थानावर राहिला. भारताचा किरण अंकुश जाधव ६३१.५ गुणांसह सहावे स्थानावर राहिला पण त्याला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. रुद्राक्ष चे वडील बाळासाहेब पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत आणि आई हेमांगिनी पाटील या परिवहन विभागात नवी मुंबई वाशी येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.





Be First to Comment