

नागोठणे : प्रतिनिधी
इस्लाम धर्मामध्ये शहादा हज जकात नमाज आणि रोजा हे पाच मूल स्तंभ महत्त्वाचे नियम बंधनकारक आहेत त्यापैकी एक कठीण रोजा हा लहान मुलांना पकडणे प्रेरणादायी आहे इस्लाम धर्मामध्ये मुला-मुलींचं वय सात वर्ष पूर्ण झाले की लहान वय गटातील मुलांना त्यांचे आई-वडील रोजा पकडण्यासाठी पवित्र रमजान महिन्यांमध्ये प्रोत्साहन देतात त्यामुळे लहान मुले हे रोजा पकडण्यासाठी उत्साहीत होऊन रोजा पकडतात.
नागोठणे येथील स्थानिक पत्रकार याकूब सत्तार सय्यद यांचा मुलगा हाश्मी याकूब सय्यद वय १० वर्ष ह्याने तसेच येथील स्थानिक रहिवासी अजहर अलीम शेख यांची मुलगी आलीजा शेख वय ०८ आठ वर्ष हिने लहान वयात पवित्र रमजान महिन्याचे संपूर्ण २९ रोजे पूर्ण केले.
मार्च महिन्यात उष्णतेच्या पाढा चढलेला असताना देखील एवढ्या मोठ्या तापत्या तापमानामध्ये रोजे ठेवणे जीवावरचे असते अशातच जीवाची परवा न करता लहानशा वयातील लहान जीवाने हाश्मी याकूब सय्यद ह्या मुलाने दररोज सकाळी पहाटे चार च्या दरम्यान गोड झोपेतून उठून रोजा पकडण्याची किमया दाखवून दिल्याबद्दल सर्व स्तरातून कु. हाश्मी याकूब सय्यद व आलिजा अजहर शेख ह्या लहानशा मुलीचे कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचे वर्षाव होतं आहेत.

Be First to Comment