Press "Enter" to skip to content

वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर चर्चा वनमंत्री गणेश नाईक यांच्या समवेत चर्चा 

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात विकासकामांच्या अनुषंगाने परवानगी व तत्सम विषयावर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सर्वोतपरी सहकार्य करण्याचे नामदार गणेश नाईक यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले. 

        पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा आणि मलनिःसारण योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेतील जलवाहिनी टाकण्यासाठी तसेच मलनिःसारण बांधण्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. या योजनेतील जलवाहिनी, मलवाहिनी अंथरणे तसेच मलनिःसारण केंद्र बांधण्याकरता करता जागेची आवश्यकता तसेच बांधकाम विभागांतर्गत देखील रस्ते काँक्रीटीकरण, गटार, स्मशानभुमी, संरक्षक भिंत आणि नवीन रस्ते तयार करण्याची कामे वन विभागांतर्गत येत आहेत. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी समस्या उद्भवत असून नागरिकांना सोयीसुविधा पासून वंचित रहावे लागत आहे. हे विषय मार्गी लावण्यसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात वन मंत्री गणेश मंत्री यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागे संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह वनविभाग व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नामदार गणेश नाईक यांनी बैठकीला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासित केले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.