

पेण, ता. ४ (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या वातावरणात बदल होऊन काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतानाच आज पेण तालुक्यात तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
एकीकडे कार्लाच्या एकविरा आईची यात्रा आज पासून सुरू झाली असून या यात्रेकरिता सकाळपासून पेण तालुक्यातून हजारो आगरी कोळी बांधव आईच्या दर्शनासाठी गेले आहेत तर या यात्रेनंतर पेणच्या ग्रामीण भागातील यांत्राचा धमाका सुरू होणार असल्याने अनेक भाविक यात्रेच्या तयारी करता लागले आहेत परंतु आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पेणमध्ये जोराचा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे.
तर अचानकपणे पाऊस जोरदार सुरू झाल्याने रस्त्यावर भाजीपाला घेऊन विक्रीसाठी बसलेल्या भाजीवाल्यांची पळापळ होऊन या वादळी वाऱ्यामुळे कासारआळी मधील बिल्डिंगची पत्र्याची शेड कोसळली असून जुना आरटीओ कार्यालय जवळ मोठे झाड उन्मळून पडले या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहत होते.

Be First to Comment