
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज शहरातील महाराजांच्या पुतळ्यास शिवसेना ठाकरे गट तसेच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पकड जातीला बरोबर घेऊन स्वराज्याची निर्मिती करून त्याकाळी सर्वसामान्यांच्या हिताचे कल्याणकारी राज्य उभे केले. त्यातच प्रशासकीय आणि महसूल यंत्रणेच्या माध्यमातून आदर्श अशी राज्यव्यवस्था उभी करून त्यामध्ये महिलांचा सन्मान तसेच शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवणारी धोरणं त्यांनी राबवली महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, जिल्हा समन्वयक नरेश गावंड, युवा सेना अधिकारी योगेश पाटील, शिवाजी पाटील, कांतीलाल म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, वैशाली समेळ आदिंसह सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे मावळे उपस्थित होते.




Be First to Comment