Press "Enter" to skip to content

कारकून नितिन शेलार यांची पंचायत समितीकडे तक्रार

वाशिवली ग्रामपंचायतीत भोंगळ कारभार निविदा रजिस्टर सरपंच, कारकून समक्ष पळविला

पेण, ता. ३ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील वाशिवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये कामाच्या मागविण्यात आलेल्या निविदा आणि आवक रजिस्टर येथील तीन ग्रामस्थांनी सरपंच आणि कारकून यांच्या समक्ष पळविला असल्याचा प्रकार घडला असल्याने याबाबतची तक्रार कारकून नितीन शेलार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.अशी माहिती विद्यमान सदस्य अविनाश मोरे यांनी दिली घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.वाशिवली ग्राम पंचायत मधील सौर दिवे बसविणे, रस्ते करणे, शौचालय , कचराकुंड्या बांधणे, विहिरींना लोखंडी जाळ्या लावणे, समाज मंदीर बांधणे यांसारख्या कामांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या.मात्र त्या निविदा आणि आवक रजिस्टर येथील ग्रामस्थ नंदकुमार पाटील, मदन पाटील, सोपान शेलार यांनी सरपंच सखाराम पवार आणि कारकून नितीन शेलार यांच्या समक्ष पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

एकीकडे सदर कामांना प्रशासकीय मंजुरी मिळण्याआधीच केलेली असून केवळ बिले काढून पैसा उकळण्यासाठी ही कामे पुन्हा काढली असल्याचा आरोप यावेळी ग्राम पंचायतचे माजी सदस्य रणजीत पवार यांनी सुद्धा केला आहे.तर ज्या निविदा पळविण्यात येत होत्या त्याला विरोध करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना ग्रामपंचायत सदस्या रोहिणी कडव यांना देखील त्यांनी अपशब्द वापरून त्यांचा मोबाईल हिसकावण्यात असल्याची माहिती देत या संदर्भात त्यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच सखाराम पवार यांचा मनमानी कारभार सुरू असून त्यांनी ग्रामपंचायत मधील तीन वर्षातील पंधरा वित्त आयोग निधी साधारणपणे २६ लाख आणि मागासवर्गीयांचा पंधरा टक्के निधी दोन ते अडीच लाख असा मिळून २८ लाख रुपये पडून ठेवल्याने गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरपंचाला सदरचा निधी हडप करण्याचा असल्याचे माजी सदस्य रणजीत पवार यांनी यावेळी सांगितले. सदर पत्रकार परिषदेला वासंती पवार, कांता वाघमारे, बायजी वाघमारे, हरिचंद्र पवार, सखाराम पवार आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबत गटविकास अधिकारी अविनाश घरत यांना विचारले असता आपण एक दिवसा पुर्वीची सदरचा चार्ज घेतला असून याबाबतची माहिती घेत आहोत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.