
नागोठणे : याकूब सय्यद
नागोठणे येथील वेलशेत आंबेघर रहिवासी अपंग संघटनेच्या वतीने नीलकंठ बडे,देवीदास ताडकर,नरेश माळी,कृष्णा बडे,स्मिता माळी, विशाल पारंगे, हेमलता पारंगे,ललित घासे या उपोषणास बसले होते.
रोहा तालुक्यातील पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ५% अपंग कल्याण व विकास निधी अनुशेषासह पूर्ण निधि वाटप न झाल्याने वेलशेत आंबेघर गावातील दिव्यांग उपेक्षित बांधव मंगळवार ०१ एप्रिल रोजी सकाळी बेमुदत उपोषणास बसलेले होते. त्यांची प्रसासकीय अधिकारी यांनी घेऊन उपोषण ०८ एप्रिल पर्यंत स्थगित करण्याची केलेल्या विंनतीला मान देऊन उपेक्षित बांधवांनी सरबत पिऊन ऊपोषणास स्थगिती दिली.

बांधवांची पिंगोडे ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे व नागोठणे सहा. पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी भेट घटनास्थळी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या चर्चेत सदरील असलेली मागणी ही रोहा पंचायत समितीच्या अखत्यारीत येत असून गट विकास अधिकारी यांना मार्च ऐंडिंगच्या कामामुळे वेळ नसल्याने सदरील अधिकारी हे मंगळवार ०८ एप्रिल रोजी दुपारी १२: वाजता पिंगोडे ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेट देणार आहेत. त्यानंतर सर्वांजवळ सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे विजय अहिरे व सचीन कुलकर्णी यांनी सांगितले. व सदरील उपोषणाला तूर्तास स्थगिती देण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देत सर्व उपोषणकर्ते बांधवांनी सरबत घेऊन उपोषणास स्थगिती दिली.
यावेळी माजी सरपंच संतोष कोळी,प्रल्हाद पारंगे, बळीराम बडे, गोरखनाथ पारंगे,साईनाथ धुळे,प्रकाश पारंगे, शैलेश शेलार तसेच वेलशेत आंबेघर रहिवाशी अपंग संघटना पदाधिकारी व सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment