Press "Enter" to skip to content

सुरेश पाटील यांच्यासह पती व कुटुंबातील तीन जणांविरोधात पोलिसांत तक्रार

आई- वडिलांकडून सोने आणि पैसे आणण्यासाठी तगादा विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ

पेण, ता. २९ ( वार्ताहर ) : पेण येथील उद्योजक सूर्यकांत उर्फ सुरेश जोमा पाटील, पती अमर सूर्यकांत पाटील व कुटुंबातील तीन सदस्य यांनी वारंवार आईकडून सोने व पैसे आणण्याचा तगादा लावत मानसिक व शारीरिक छळ केला असल्याची तक्रार सून प्रज्ञा अमर पाटील हिने पेण पोलीस ठाण्यात केली असल्याची माहिती दि.२९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

याबाबत तक्रारदार प्रज्ञा पाटील यांचे विवाह पेण येथील अमर सुरेश पाटील यांच्या बरोबर २०१३ मध्ये झाला पती अमर यांचा हॉटेल, ट्रान्सपोर्ट यासह जागा व्यवसायासाठी आवश्यक भांडवल कमी पडू लागल्या नंतर त्यांनी हुंड्या साठी मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचे प्रज्ञा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगत पती अमर पाटील हे मारहाण करुन मला विवाहाच्या वेळी तुझ्या बापाने पन्नास लाख रुपये तसेच फोर व्हीलर गाडी दिली नाही मी तुझे हाल करुन तुझे जगणे मुश्किल करुन ठेवीन असे म्हणून वारंवार शिवीगाळ व मारहाण करू लागला, मात्र माझ्या वडिलांची तब्येत व मानसिक अवस्था नाजूक असल्याने मी हा त्रास सहन करत राहिले त्यानंतर २०१५ मध्ये मला मुलगा झाला यात मला वाटले हा त्रास आता कमी होईल मात्र तसे न होता सासरे सुरेश पाटील, पती अमर पाटील, सासू लक्ष्मी पाटील, दीर भरत पाटील, जाऊ रचना भरत पाटील, नणंद हर्षदा राहुल पाटील हे सर्व मिळून आणखीनच त्रास देऊ लागले.तसेच ऑक्टोबर २०२१ मध्ये मला परस्पर माहिती न देता माझ्या वडिलांकडे पन्नास लाख रुपये मागणी केली होती, सदरची मागणी पूर्ण न केल्यास तुमच्या मुलीला ठार मारून टाकू अशी धमकी दिली होती.

नाईलाजास्तव वडिलांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन रोख २३ लाख रुपये व आयुष्यभर कष्टाने कमविलेले ३० तोळे सोने एप्रिल २०२२ मध्ये मला माहिती नसताना आमच्या राहत्या घरी दिले असल्याचा आरोप देखील प्रज्ञा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.यानंतर माझ्या माहेर वरून आणलेले दागिने बँकेत गहाण ठेऊन घेतलेले पैसे गरजू व आर्थिक मंदी मध्ये फसलेल्या लोकांना दरमहा १० ते १२ टक्के प्रति महा दराने व्याजी देऊन व्याजाचा धंदा करत आहेत.यातच एखाद्याने व्याज व मुद्दल न देणाऱ्यांना घरात कोंडून ठेवणे, मारहाण करणे यासारख्या घटना माझ्या डोळ्यादेखत घडल्या असल्याचेही प्रज्ञा पाटील यांनी सांगितले आहे.तसेच पती अमर पाटील याचे इतर महिले बरोबर अनैतिक संबंध असल्याचे या प्रकरणी अमर पाटील याचे विरोधात पेण पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि. कलम ३७६ प्रमाणे गुन्हा रजि. नं. १३५ / २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.मला यांच्याकडून हुंड्या साठी वारंवार होणारा छळ यामुळे नाईलाजाने मी ०२/०८/२०२४ रोजी पेण पोलीस स्टेशन मध्ये नवरा, सासू, सासरे, दिर, नणंद यांच्या विरोधात गुन्हा रजि. नंबर २२६/२०२४ कलम ८५, ७५(१), ११५(२),३५२, ३५१(२), ३५१ (३)(५) अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

यानंतर चार दिवसापूर्वी २६ मार्च २०२५ ला देखील रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सासरे सुरेश पाटील यांनी माझ्या चरित्र्यावर खोटे नाटे संशय घेऊन आताच्या आता हे घर खाली कर, तुझा माझ्या मुलाशी व आमच्या घराण्याशी काही संबंध नाही, बापा कडून सोनं व तीस लाख रुपये घेऊन ये तेव्हाच तुला या घरात आसरा मिळेल तर पती अमर याने देखील शिवीगाळ करत बंदूक काढून माझ्या डोक्याला लावून गोळ्या झाडून मला ठार मारण्याची धमकी देऊन लाथा बुक्क्याने मारहाण केली.या बाबत २८ मार्च २०२५ ला पेण पोलीस स्टेशन मध्ये सासरे सुरेश पाटील, पती अमर पाटील, सासू लक्ष्मी पाटील, दीर भरत पाटील, जाऊ रचना भरत पाटील, नणंद हर्षदा राहुल पाटील यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी मागणी मी पोलीस प्रशासनासह महाराष्ट्राचे राज्याचे गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महा संचालक, रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कडे देखील तक्रार दाखल केली असल्याचे प्रज्ञा पाटील यांनी पत्रकार परिषदेत शेवटी सांगितले.

तक्रारदार प्रज्ञा अमर पाटील यांनी जो तक्रारी अर्ज दिला आहे त्या अनुषंगाने या अगोदरच यातील तीचे सासरे सूर्यकांत उर्फ सुरेश जोमा पाटील, पती अमर सूर्यकांत पाटील, सासू लक्ष्मी सूर्यकांत पाटील, दिर भरत सूर्यकांत पाटील, नणंद हर्षदा राहुल पाटील यांच्यावर २ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल होऊन त्याचे दोषारोप पत्र याच महिन्यात न्यायालयात दाखल केले आहे.मात्र आता २८ मार्च रोजी पुन्हा तक्ररदार प्रज्ञा पाटील यांच्याकडून आलेल्या तक्रारी अर्जानुसार पोलिसांमार्फत १४ दिवसांच्या आत तपास करण्यात येणार असून सदर तपासांअंती यातील पाचही जण दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

संदीप बागुल, पोलीस निरीक्षक पेण

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.