
रायगड सुरक्षा रक्षक मंडळात नोंदीत उमेदवारांना त्वरित नोकऱ्या द्या, दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा – आ. विक्रांत पाटील यांची विधान भवनात मागणी.
रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून नोंदीत झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अजूनही नोकऱ्या लागत नाहीत या महत्वपूर्ण विषयाकडे आ. विक्रांत पाटील यांनी अधिवेशनात लक्षवेधी च्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेतले. 2018 साली सर्व कागदपत्र छाननी, मैदानी परीक्षा घेऊन ही भरती प्रक्रिया राबाविली गेली होती आणि त्यामध्ये एकूण 3633 युवांची नोंदणी पूर्ण करून त्यांना अधिकृत बी फॉर्म देऊन नोंदीत केले गेले होते. परंतु गेल्या पाच वर्षात प्रतीक्षा यादीत समाविष्ट असणाऱ्या या सर्व उमेदवारांपैकी केवळ 617 जणांनाच आत्तापर्यंत नोकऱ्या मिळू शकल्याने या मध्ये अधिकारी, कंपनी, खासगी सुरक्षा रक्षक एजन्सी यांचे एकमेकांशी साटेलोटे असल्याचे सांगून आ. विक्रांत पाटील यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी केली. रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या कामकाजात अनेक प्रकारच्या अनियमितता असून याचा त्रास नोंदीत सुरक्षा रक्षकांना सहन करावा लागत असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. बोर्डाची मान्यता न घेता बिनधास्त पणे सुरु असलेल्या खासगी सुरक्षा एजन्सी वर कार्यवाही सुरु करण्याचीही मागणी आ. विक्रांत पाटील यांनी केली.

सिडको, म्हाडा, कॉटन कॉर्पोरेशन व इतर सरकारी, निम सरकारी आस्थापाना सुद्धा सरकारी संस्था असलेलेल्या रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणार नसतील तर यावर कार्यवाही करावी, रायगड जिल्ह्यात हजारो कंपन्या असतानाही बोर्डाच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत केवळ 233 कंपन्याच बोर्डात नोंदीत होऊ शकल्या आहेत त्यामुळे या मध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी,बोर्डातील निरीक्षक, राऊंडर सह सर्व पदे रिक्त आहेत त्यामुळे काम करण्यासाठी अध्यक्ष व सचिव यांच्याशिवाय कोणीही उपलब्ध नसल्याने ही पदे तातडीने भरली जावी,प्रतीक्षा यादीतील सर्व युवा उमेदवारांना त्वरित नोकऱ्या मिळण्यासाठी ठोस कार्यवाही करावी अश्या सर्व मागण्या आक्रमक पणे लक्षवेधी च्या माध्यमातून आ. विक्रांत पाटील यांनी मांडत कार्यवाही चीं मागणी केली. या वर कामगार राज्य मंत्री श्री आशिष जैस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व विषयावर गांभीर्याने लक्ष घालून कार्यवाही करणार असल्याचीं शास्वती दिली.

Be First to Comment