Press "Enter" to skip to content

मुंबई मित्र आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा थाटात संपन्न

मुंबई (पंकजकुमार पाटील) : मुंबई मित्रचे समूह संपादक अभिजीत राणे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मुंबईत गोरेगाव येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “क्षितिजाच्या पलीकडे” या धमाल बालनाट्याने झाली.

वर्षा राणे दिग्दर्शित आणि लेखक धनंजय सरदेशपांडे यांच्या या नाटकात अनन्या पोवळे, मेधांश गुजराथी, पार्थ चोडणकर, ध्रुव दळवी, हार्दिका मिरकर, हर्षित वेंगुर्लेकर बालकलाकारांनी छान अभिनय करून कार्यक्रमाची शोभा अजून वाढविली. या नंतर मुंबई मित्र आयोजित निबंध लेखन स्पर्धा, कथालेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, गणेश दर्शन स्पर्धा २०२४ आदी स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कमेची पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये मुंबईच्या कवी भूषण तांबे यांना राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मराठी साहित्य क्षेत्रातील दिग्गज साहित्यिक, पत्रकार मंडळी वैभव पाटील, भारती भाईक, पल्लवी येवले, रोहिणी हस्तक, पल्लवी उमरे, भारती सावंत, प्राजक्ता बोवलेकर आणि इतर संस्थांचे पदाधिकारी या मान्यवरांना देखील पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यासाठी वर्सोव्ह्याच्या माजी आमदार भारतीताई लवेकर, माजी नगरसेवक योगीराजजी, श्री गणेश खांडकर, आयपीएस अधिकारी श्री रामराव पवार, श्री विनोद शेलार, दै हिंदी सामनाचे कार्यकारी संपादक अनिल तिवारी, श्री अमोल कीर्तिकर, श्रीमती गीताताई संजय निरुपम, सौ अनघा राणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निनाद व जेष्ठ पत्रकार राजेश विक्रांत यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ अनघा राणे यांनी करून कार्यक्रम संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.