

‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ या मोहिमेअंतर्गत युवकांना राष्ट्र आणि धर्माप्रती कृतिशील करण्याची हिंदू जनजागृती समितीची मोहीम ! हिंदू जनजागृती समितीचा उपक्रम !
रायगड – ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ या मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार २३ मार्च या दिवशी रायगडच्या पाली येथील सुधागड येथे मोहीम संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचे दैदीप्यमान शौर्य, राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्यांचे योगदान,युवक आणि युवतींच्या मनात बिंबवणे,
तसेच, वर्तमान काळात राष्ट्राविषयी असलेल्या दायित्वाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने समिती हि मोहिम राबवत आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ३७ जणांनी मोहिमेत सहभाग घेतला.
रायगडच्या पाली येथील सुधागड या किल्ल्या वरील मोहिमेत पनवेल, खोपोली, पेण आणि वराड येथील युवक सहभागी झाले होते.
गडाच्या पायथ्याशी प्रार्थना करून मोहिमेला प्रारंभ झाला.
व-हाड गावातील श्री. रोशन खंडागळे आणि श्री. हर्षल खंडागळे यांनी सर्वांना गडाची माहीती दिली. यामध्ये गडावरील बुरूज, तेथे असलेल्या समाधी, दारुगोळा ठेवण्याची ठिकाण, त्याकाळातील राहण्यासाठी असलेले वाडे, आणि पाण्याचे तलाव यासंदर्भात सर्वांना माहिती देण्यात आली.

गडाच्या परिसराची स्वच्छता
गडाच्या शिखरावर पोहचल्यावर तिथे असलेल्या महादेव मंदिर, श्री भोराई मातेचे मंदिर, श्री हनुमान मंदिर या परिसरात वाढलेले गवत, खराब आणि निर्माल्य योग्य झालेले ध्वज, प्लास्टिक कचरा इ.उचलून आणि येथील पत्र्यांची योग्य रचना करून स्वच्छता करण्यात आली.
चर्चा सत्र आणि आपत्कालीन प्रशिक्षण
त्यानंतर एकत्रित भोजन झाल्यावर
आपत्कालीन परिस्थितीला समोर कसं जायला हवं आपल्या परिजनांचे आपण रक्षण कसं करू शकतो या संदर्भात आपत्कालीन प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले.
मुलांनी हे प्रशिक्षण अगदी लक्षपूर्वक शिकून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भोराई मातेच्या मंदिरातील शक्ती, चैतन्य अनुभवण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक नामजप केला.
महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि रामराज्य स्थापनेसाठी प्रतिज्ञा करून येथे आलेले सर्व युवक राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध झाले..
या मोहिमेत सहभागी झालेल्या युवांचे मनोगत झाल्यानंतर हिंदू जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी राष्ट्र साठी आपण काय करू शकतो यां विषयी युवकांना संबोधित केले.
मोहिमेचा उद्देश
युवक युवतींना संबोधित करताना सुनील कदम म्हणाले की आज प्रत्येकाला महाराजांचा इतिहास समजावा त्यांचं शौर्य ,मावळ्यांचा त्याग लक्षात यावा याच उद्देशाने आपण हे गड किल्ले मोहीम घेत असतो.
या मोहिमेला येताना केवळ आपण ट्रेकिंग साठी न येता येथील गडाची स्थिती पाहिल्यावर महाराजांचे विचार, दूरदृष्टी आणि मावळ्यांचा त्याग यामधून आपण सर्वांनी शिकून पुन्हा एकदा शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य यावे यासाठी वेळ द्यायला हवा.
या सर्व मोहिमेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं आध्यात्मिक बळ वाढावं, आपल्या सगळ्यांमधील शौर्य वाढावं, यासाठी या मोहिमेचे नियोजन केले जाते..
यासाठीच वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये साधनेचे महत्त्व काय आहे भगवंतचे अधिष्ठान ठेवून कार्य कसे करायचे याचे महत्त्व सांगितले
यानंतर कृतज्ञता व्यक्त करून या मोहिमेची सांगता झाली.
आमच्या गावातील सुद्धा अनेक युवावर्ग वेगवेगळ्या गडदुर्गावर स्वच्छता मोहिमेसाठी जात असतो.
इकडे जी मोहीम होते तर ती आध्यात्मिक स्तरावर केली जाते केवळ संवर्धन म्हणून न करता त्यातून साधना कशी होणार आहे , नवीन पिढी कशी घडणार आहे या दृष्टीने ही मोहीम घेतली जाते.अशी प्रतिक्रिया अनेक युवकांनी दिली.
श्री भोराई मातेच्या मंदिराचे पुजारी यांचा अभिप्राय
या गडावर अनेक गड संवर्धन करणाऱ्या संघटना येत असतात. शिवप्रेमी येत असतात .पण तुम्ही जे काही राष्ट्रधर्माचा कार्य करत आहात असं कार्य मी आत्तापर्यंत कुठेच बघितलं नव्हतं .तुमच्या गुरुदेवांनी तुम्हाला दिलेली शिकवण खूप चांगली आहे आणि अशा प्रकारचे राष्ट्र कार्य करणारे लोक आज आपल्याला समाजामध्ये हवे आहेत.

Be First to Comment