Press "Enter" to skip to content

महिला मार्गदर्शन शिबिर मुंबई उपनगर येथे थाटात संपन्न

प्रतिनिधी : याकूब सय्यद

दिनांक १५ मार्च २०२५ रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन मुंबई शहर आणि बी इन ग्रुप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तू स्वयं सिद्ध हो या अभियाना अंतर्गत समाजसेवक संजय माळी आणि बी इन ग्रुप फाउंडेशनचे विश्वस्त रोहिणी जाधव यांच्यातर्फे महिला बेरोजगार प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर मुंबई उपनगर येथे क्या आयोजित करण्यात आले होते.

सदर महिला उद्योग मार्गदर्शन शिबिर ह्या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गायकवाड यांनी केले वैशाली पवार आणि त्यांच्या मंडळींनी नृत्य अविष्कार उपस्थितांचे मनोरंजन केले.
महिला उद्योग मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता जगदीश गायकवाड ,उमेश गायकवाड, गणेश भालेराव रामचंद्र घाडगे, मंजुळा मोरे, लता खराडे, नम्रता कदम यांनी विशेष मेहनत घेतली होती.

महिला रोजगार मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाकरिता लोक प्रसिद्ध उद्योगपती नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, काँग्रेस पक्षाचे नेते चरणजीत सप्रा, डॉ शैलेश जाधव,काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते अँड जीवनदत्त अरगडे संजय जी निंबाळकर अशी अनेक मान्यवर मंडळी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

बी एन फाउंडेशनचे विश्वस्त रोहिणी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी खेडो पाड्यांमध्ये भटक्या विमुक्त समाजाच्या वस्त्यांमध्ये जाऊन अन्न धान्य तसेच वस्त्राचे वाटप व औषध वाटप मेडिकल कॅम्प एज्युकेशनल कॅम्प प्रशिक्षण शिबिर कार्यक्रम संस्था राबवित असते अशी महत्त्वपूर्ण माहिती देत यापुढे असेच बी एन फाउंडेशन संस्थेमार्फत लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतील यापुढील होणाऱ्या कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांनी आम्हाला यापुढे आपापल्या परीने सहकार्याची भूमिका घेत सहकार्य करावे असे रोहिणी जाधव यांनी सांगितले. महिला उद्योग मार्गदर्शन शिबिरासाठी असंख्य मोठ्या प्रमाणात महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.