Press "Enter" to skip to content

उरण तालुक्यातील मोठी जुई गावात समाजकंटकांनी शेत तळी मधील मच्छी पाण्यात केमिकल टाकून मारली ?

उरण : तृप्ती भोईर

समाजकंटक म्हणजे समाजाचे शत्रू ,वैरी ,अपप्रवृत्तीचे लोक अशा लोकांच्या डोक्यात चांगले विचार कधीच येऊ शकत नाही. ते नेहमी समाजाला उपद्रव देतात काही ना काही समाजाला नुकसान होईल असे वर्तन करीत असतात.

अशीच एक घटना उरण तालुक्यातील मोठी जुई गावात दिनांक १२ मार्च रोजी मोठी जुई गावातील शेतकरी संतोष पुंडलिक भगत यांच्या शेततळी मध्ये काही नतदृष्ट समाजकंटकांनी शेततळीमध्ये विषारी केमिकल टाकल्यामुळे त्यातील मच्छी मृत झाली आहे.

गावातील गावकरी वर्षभर आपली शेततळी मेहनत घेऊन त्यांचा सांभाळ करत असतात, पावसाळी मच्छींची प्रजाती सोडली जाते. जिताडी, चिंबोरी, इंग्लिश मासे यांसारख्या जातीची मच्छी सोडली जाते. आणि ती वर्षभर त्या मच्छीला जिवापाड जतन करून तिच्यासाठी ती मोठी होण्यासाठी उत्तम प्रकारे देखभाल केली जाते. तिचे पालन पोषण करून ती मच्छी मोठी केली जाते आणि वर्षाच्या होळीच्या सणानिमित्त ती मच्छी धुळीवंदनाच्या दिवशी आपल्या मित्र, आप्तेष्टांना, नातेवाईकांना ही मच्छी भेट या स्वरूपात दिली जाते अशा या मच्छीला वेगळीच चव असते त्यामुळे या मच्छीचे त्या दिवसाला. वेगळेच महत्त्व असते.

दिनांक १२ मार्च रोजी रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार झाला आहे. जुई गावातील संतोष भगत या शेतकऱ्यांची शेतावर असलेली शेततळ्यातील मच्छी कोणते तरी विषारी औषध, केमिकल टाकून जाणीवपूर्वक मारण्यात आली आहे . शिजलेल्या भातात मिक्स करून त्यात औषध टाकून तो भात या मच्छीला खाण्यासाठी पाण्यात टाकण्यात आला आणि तो भात खाल्ल्यामुळे या शेततळ्यातील मच्छी गतप्राण झाली आहे. या अगोदरही आठ दिवसांपूर्वी गावात नाईट मॅचेस चालू होत्या क्रिकेटच्या त्यावेळीही हाच प्रकार झाला होता पण त्या वेळेला कमी प्रमाणात मच्छी मारण्यात आली होती पण रात्री या शेततळ्यातील संपूर्ण मच्छी मारण्यात आली आहे .त्याच्यामुळे शेततळी तील पाणी पूर्ण दूषित झाले आहे. आणि या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास येत आहे.येथील शेतकऱ्यांनी एवढी मेहनत घेऊन मच्छी वाढवली आणि त्याचा कोणताही या शेतकऱ्याला फायदा न होता याउलट नुकसान झाले आहे. मग शेवटी जड अंत करणाने त्यांनी ही आपली मच्छी आपल्या शेतातील एका नारळाच्या झाडाखाली खड्डा खणून ती पुरण्यात आली आहे.

हे कृत्य कोणी केले आहे हे अद्यापही समजले नाही.पण समाजातील अशा समाजकंटकांना शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे पुन्हा कधी अशी घटना होणार नाही असे बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.