
नवी मुंबई : तू मातृत्व ,तू नेतृत्व तू कर्तृत्व अशी थोरवी असणाऱ्या समस्त महिला वर्गाला अभिवादन करण्यासाठी अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन वतीने तुर्भे विज्ञान केंद्र नवी मुंबई येथे दिनांक ८ मार्च रोजी महिला दिनाचे आयोजन करण्यात आलें होते.
अगस्त्या फौंडेशन ही एक अशी संस्था आहे की जेथे संपूर्ण भारतभर मोठया संख्येने महिला छानप्रकारे काम करतात. अगस्त्या फौंडेशन हे महिलासाठी एक सुरक्षित व आंनददायी वातावरण असणारे ठिकाण आहे. यासाठी विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. पॉश तसेच पॉकसौ कायदा प्रशिक्षण,तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन व्यख्याने, कार्यशाळा,सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धा घेतल्या जातात.
यावेळी महिला दिन कार्यक्रम सादर करत असताना ज्ञान माहिती,मनोरंजन,खेळ स्व अनुभव असा विविधरंगीं कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सर्व महिला इग्नेटर यांना मा.विक्रांत सोळंकी,मा.पराग सावंत यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आली.प्रास्ताविक पराग सावंत सर यांनी केले.

यांनतर सिनियर इग्नेटर प्रदीप कासुर्डे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा पीपीटी द्वारे घेतला.यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्वातील माहित नसलेले विविध पैलू समोर आलें. नंतर विविध ग्रुप खेळ घेण्यात आलें. यात गाण्यावरून वस्तू ओळखणे,अभिनय करून सिनेमाचे नाव ओळखणे, अंताक्षरी घेण्यात आली. तसेच आपल्या जीवनात प्रेरणा स्थान असलेल्या महिलांबद्दल अनुभव सादर करण्यात आलें. यावेळी अनेकांनी आपले हृदयस्पर्शी अनुभव सांगितले.
या कार्यक्रमात सारथी यांनीही उस्फुर्त सहभाग घेऊन सुंदर सुंदर गाणी सादर केली.या कार्यक्रम साठी कौस्तुभ दीक्षित,सार्थक सपकाळ,समीर मुळे,शुभांगी लोंढे,प्राची जाणवलेकर,रेश्मा सोमववंशी प्रियांका भोपी,आकांक्षा चौधरी पल्लवी जाधव,पल्लवी पट्टेबहादूर,प्रियांका पाटील,रिंकू पडवळ,तेजस्विता माळी,हर्षदा शिर्के,हर्षला चौधरी,दिपाली हरणे,कल्याणी उगळे , पूनम मस्कर,अश्विनी कोंडाळकर, संतोषी दोंडे,प्रेरणा पडवळ, सरिता चव्हाण,प्राजक्ता राजपुरे, ऋतुजा माने,वैष्णवी जाधव, श्रेया रावराणे,मोहमद जावेद, विशाल सातुपे,आदेश बिल्ले चित्तरंजन कुंभार,तेजस पवार, कुणाल मोरे,हरीश सूर्यवंशी, अनिल चासकर उपस्थित होते. अतिशय सुंदर रित्या कार्यक्रम पार पडला असून आपण सर्व मिळून ही अगस्त्या चळवळ पुढे नेऊ या अशा अपेक्षा सर्वांनी व्यक्त केल्या.

Be First to Comment