
प्रतिनिधी : सतीश वि.पाटील
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांचे( मराडेपाडा) येथील पहीले भव्य मंदिर साकार झाले.शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजु चौधरी यांनी त्यांच्या सहकार्यासह तब्बल सात वर्षांच्या अथक प्रयत्नातून हे मंदिर साकारले आहे.या मंदिराचा लोकार्पण सोहळा चार दिवसाच्या धार्मिक विधी कार्यक्रमाने १७मार्च रोजी तिथीनुसार साजरा होणारे शिवजंयती दिनी होत आहे.
या वेळी देशभरात छत्रपती शिवाजीमहाराज दैवत म्हणून भक्तिभावाने पूजा केली जाते.३५०वर्षानंतरही गडकिल्ले सोडले तर त्याचे अनेक पैलू समाजासमोर आलेले नाहीत. त्यामुळे शिवक्रांती प्रतिष्ठानने उभारलेले छत्रपती शिवाजीमहाराज मंदिर नक्कीच अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.शिवरायाच्या मंदिराचा कळश रोहन,मुर्ती प्रतिप्रतिष्ठा सोहळा आणि लोकार्पण सोहळा १४ते१७ मार्च या चार दिवसाच्या दरम्यान पार पडणार आहे.

या मध्ये दिव्य हरिपाठ, ऐतिहासिक कार्यक्रम छत्रपती शिवाजीमहाराजांची भव्य मिरवणूक शिवसोहळा असे कार्यक्रम आयोजित केले असून १७ मार्च सकाळी भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेक साधुसंत ,महंत,कीर्तनकार, प्रवचनकार तसेच असंख्य शिवभक्तांची उपस्थिती असणार असल्याची माहीती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष: डाॅ.राजू चौधरी यांनी माध्यमातून दिली आहे.मंदिर बनवताना शिवकालीन इतिहास साक्ष ठेवून हुबेहुब गडकिल्ल्यांवर गेल्याचा भास निर्माण होईल अशी रचना आहे बुरूज ,गुमट ,तैलचित्र यातून नवीन पिढीला प्रेरणादाई ठरेल अशी अपेक्षा आहे!
” जय शिवराय “

Be First to Comment