Press "Enter" to skip to content

‘कर्तृत्वान महिलांचा सन्मान’ सोहळा

सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान; 
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने सन्मान 

पनवेल (प्रतिनिधी) स्त्रिया म्हणजे केवळ माया, ममता आणि कुटुंबाचा आधार नाहीत, तर त्या जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाची मूर्तिमंत प्रतीक आहेत. इतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत आपले नाव कोरले आहे. स्त्रिया फक्त घर सांभाळणाऱ्या किंवा समाजातील पारंपरिक भूमिका निभावणाऱ्या व्यक्ती नाहीत, तर त्या समाजाच्या प्रगतीचे आणि विकासाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व सौ. शंकुतला रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मातोश्री दिवंगत यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त यमुना शैक्षणिक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने शेलघर येथे आज (दि. ११) संपन्न झालेल्या ‘कर्तृत्वान महिलांचा सन्मान’ सोहळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते सौ. शंकुतला रामशेठ ठाकूर यांचा सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्काराने समारंभपुर्वक सन्मान करण्यात आला. 

दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन पाटील, शिक्षकनेते दा.चा.कडू गुरुजी, संस्थेचे संस्थापक महेंद्र घरत, सचिव शुभांगी घरत, राम म्हात्रे, रघुनाथ घरत, राजेंद्र पडते, डॉ. मनीष पाटील, मिलिंद पाडगावकर, कामगारनेते वैभव पाटील, किरीट पाटील, आदी उपस्थित होते. 

           थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. आजपर्यंत १०० कोटीहून अधिक रुपयांची देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला दिली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा शैक्षणिक वारसा जपण्याचे कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर अखंडपणे करत आहेत.लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विधायक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी मुक्तहस्ते मदत केली आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यालयांना उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांची कन्या आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला कोट्यवधी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात सौ. शकुंतला ठाकूर यांचे कार्य उल्लेखनीय असे आहे. 

चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागते. माणुसकी आणि विचार अमर असतात. शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वानी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणे गरजेचे आहे आणि याच सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबिय कार्य करीत असतात. समाजाचे आधारस्तंभ असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत आणि त्याचबरोबरीने त्यांच्या अर्धांगिनी सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांनीही सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विधायक कार्यात सौ. शकुंतला ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचा यमुना शैक्षणिक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. 

 ‘यमुना स्त्री सन्मान’ पुरस्कार’ ने यांचा झाला सन्मान 

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर (सामाजिक व शैक्षणिक), 

सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (कला )

प्रमदा बिडवे (प्रशासन )

डॉ. शीतल जोशी (वैद्यकीय )

डॉ. समिधा गांधी (वैद्यकीय )

डॉ. कीर्ती समुद्र (वैद्यकीय )

डॉ. प्रकाश निघूकर (वैद्यकीय )

डॉ. जिज्ञासा विजय कडू (वैद्यकीय )

सुरेखा म्हात्रे (शैक्षणिक )

अनुराधा उरसल (क्रीडा)

रिया पाटील (क्रीडा)

प्राची ठाकूर (कला )

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.