

नवी मुंबई प्रतिनीधी: सतीश वि.पाटील
आपली संस्कृती टिकली तर आपण टिकू तसेच आजच्या पिढीतील आगरी कोळी समाजातील महिलांनी आपल्या जेष्ठ धवला शिकावा व आपल्या संस्कृतीचा ठेवा भावी पिढीला दाखवून द्यावा,असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.जागतिक महीलादिनानिमित्त तुर्भे गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वतीने पारंपारिक “धवला गीत” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

आगरी कोळी समाजातील लग्नसमारंभात विधी धवलागीता शिवाय पुर्ण होत नाही.मात्र आज ही परंपरा लुप्त होवू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी महीलादिनाचे औचित्य साधत पहिल्यांदाच नवीमुंबई धवलागीत पारंपारिक स्पर्धेचे आयोजन केले.यावेळी शहरातील ४० महीला धवलारीनींनी सहभाग घेतला होता.यामध्ये ८५ वर्ष च्या आजींनी भाग घेऊन उपस्थितांना जणू धवला गीताची मेजवानीच सादर करून मंत्रमुग्ध केले प्रत्येक स्पर्धकांनी लग्नातील प्रत्येक विधीतील धवलागीत गाऊन त्याचा अर्थ श्रोत्यांसमोर सांगितला.यावेळी गाण्याच्या ठेक्यावर तालासुरात नाचत आंनद मौज करण्यात आली.
आगरीकोळी समाजात धवलीरीन एक महीला ब्राम्हणच सद्यस्थितीत जेष्ठ धवलारीन कमी होत आहेत, नवीन धवलीरीन कमी प्रमाणात तयार होतानाचे चित्र आहे.त्यामुळे आगरी कोळी समाजाची संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक धवलीरींचा सन्मान करण्यात आला.
प्रथम क्रमांक सुमन पाटील (गोठीवली गाव ) द्वितीय क्रमांक हौसाबाई सुतार (वाशीगाव )तृतीय क्रमांक यशोदाबाई पाटील (दिवागाव) यांनी पटकावला,या कार्यक्रमात महीलासाठी खास लकी ड्रॉ आयोजन केला होता.या लकी ड्राॅ विजेत्या शंकुतला पाटील यांनी मिळवला ,या स्पर्धेचे परीक्षक म्हणून गायिका दासरी ताई पाटील , नवनाथ ठाकूर (धवलालेखक), अवनी पाटील युट्यूबर यांनी पाहीले अनेक पत्रकार व श्री.सतिश वि.पाटील( पत्रकार)मुलुंड उपस्थित होते. सर्वाचा सत्कार करण्यात आला.

Be First to Comment