
धुतूम गावचे माजी सरपंच धनाजीशेठ ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सलग चौथ्यांदा ध्वजदिन निधीसाठी दिले पाच लाख
रायगड : ( याकूब सय्यद) दि.11:-
धुतूम गावचे माजी सरपंच धनाजीशेठ ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सलग चौथ्यांदा ध्वजदिन निधीसाठी मदतीचा रुपये 5,00,000/-(रुपये पाच लाख मात्र)चा धनादेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सूपूर्द केला. त्यांच्या या मदतीबद्दल जिल्ह्यातील माजी सैनिकांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी धनाजी ठाकूर यांचे चिरंजीव ॲड.किशोर ठाकूर उपाध्यक्ष, उरण तालुका बार असोशिएशन, धुतूम गावचे माजी उपसरपंच सदानंद विठ्ठल ठाकूर व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट़ राज्य, पुणे यांच्या अखत्यारीतील रायगड जिल्ह्यामधील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून युध्द विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे पाल्य यांच्याकरीता विविध कल्याणकारी योजनांद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. विविध कल्याणकारी योजनांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजदिन निधी संकलन समिती मार्फत ध्वजदिन निधी संकलित केला जातो. अशा ध्वजदिन निधीस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी, स्वेच्छेने निधी देणारे दानी व्यक्ती यांच्याकडून निधी संकलित केला जातो.
माजी सैनिकांचे कल्याणार्थ ध्वजदिन निधीस सढळ हाताने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.

Be First to Comment