पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी करिअर विषयक मार्गदर्शन सत्र रविवार, दि. ०९ मार्च २०२५ रोजी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त), खांदा कॉलनी येथील महाविद्यालयात आयोजित केले आहे. महाविद्यालयात प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली “करिअर व रोजगार” विषयक वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. त्याचाच एक भाग म्हणून या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

इयत्ता बारावी आणि पदवी नंतरच्या “करिअरच्या संधी” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चाणक्य मंडल परिवार, पुणे चे विश्वस्त आणि न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन्सचे संचालक डॉ. भूषण केळकर यांचे मार्गदर्शन सत्र व विद्यार्थी संवाद रविवार, दि. ०९ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता होणार आहे.प्रस्तुत कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील आणि प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्रा. एस.एस. कांबळे यांनी पनवेल व सभोवतालच्या परिसरातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांना निमंत्रित केले आहे तसेच विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सत्रात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Be First to Comment