
पनवेल (प्रतिनिधी) विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या बिजनेस स्कूल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पनवेल येथील कोहिनुर टेक्निकल इन्स्टिट्यूट अर्थात केटीआयच्या शाखेच्या ‘मोशन सेन्सर’ या प्रोजेक्टने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेमध्ये बारा नामांकित कॉलेजेसनी सहभाग घेतला होता.याचबरोबर केटीआय संस्थेच्या विविध शाखांमधून देखील या स्मार्ट इनोव्हेशन चॅलेंजसाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले प्रोजेक्ट्स ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमधून केटीआयच्या पनवेल शाखेतील ‘मोशन सेन्सर’ या प्रोजेक्ट ला प्रथम क्रमांक मिळाला व के.टी.आय.ठाणे शाखेतील *टेक ट्रेसर* या प्रोजेक्ट ला द्वितीय क्रमांक मिळाला तसेच दादर शाखेतील *फूटस्टेप पॉवर जनरेटर* या प्रोजेक्टला तृतीय क्रमांक मिळाला. उत्तम सादरीकरण व नाविन्यता याचा विचार करून प्रोजेक्टची निवड करण्यात आली.

प्रोजेक्टमध्ये प्राविण्य मिळवण्याचे कोहिनूर टेक्निकल संस्थेचे हे सलग तिसरे वर्ष असून हॅटट्रिक विक्रम प्राप्त केले आहे. पनवेल शाखेचा प्रोजेक्ट व्यवस्थापक सीमा नाईक आणि शिक्षक सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश मुने, सतीश साठे, निखिल गावडे, रोहित पाटील, विघ्नेश घाडी, सादिक मुझावर, अनिकेत पाटील यांनी सादर केला होता.
केटीआयच्या सर्व शाखांमध्ये अभ्यासाबरोबरच अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच लक्ष केंद्रित केले जाते तसेच त्यांना बाहेरील इतर स्पर्धांमध्ये देखील भाग घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातात.याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. सर्व कॉलेजेस मधून के .टी आय च्या शाखांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व या स्पर्धेच्या युगामध्ये अशा प्रकारचे यश संपादन करणे खरोखरच कौतुकास्पद आहे अशा शब्दात पालकांनी मनोगत व्यक्त करून केटीआय संस्थेचे आभार मानले.

Be First to Comment