
रोहा : समीर बामुगडे
पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. बसस्थानक परिसरात सुरक्षेच्या अभावामुळे एक महिलेवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या बस स्थानकांमध्ये प्रवासी सुरक्षेची ही स्थिती चिंताजनक आहे. आता प्रश्न असा आहे की, रोहा आगार व्यवस्थापन या घटनेतून काही धडा घेणार आहे का ?
रोहा बस स्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांत असुरक्षिततेचे प्रमाण वाढले आहे. येथे अनधिकृत दलाल आणि एजंटांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येते. तसेच रोहा बसस्थानक मध्ये अजिबात स्वछता नाही,सगळीकडे दुर्गंधी आहे,पाण्याची नीट सुविधा नाही.
स्थानक परिसरात काही संशयास्पद महिलांचा संचार वाढला आहे. या महिलांचे वागणे संशयास्पद असून, त्या प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या हेतूबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. तसेच, भिकाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे मागणे, त्रास देणे असे प्रकार वाढले असून, या सर्व गोष्टींमुळे प्रवाशांना अस्वस्थ वाटते. अस्वछ रोहा बसस्थानक आत्ता कधी सुधारणार, असा प्रश्न सामन्य प्रवासी वर्ग विचारत आहे.

स्वारगेट बस स्थानकातील घटनेनंतर तरी रोहा आगार व्यवस्थापनाने जागे होऊन काही कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
- दलाल आणि एजंटांवर कठोर कारवाई – आगार प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने दलाल आणि एजंट यांना हाकलून लावावे.
- सुरक्षा यंत्रणा बळकट करावी – सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून सतत नजर ठेवावी.
- संशयास्पद व्यक्तींवर विशेष लक्ष – संशयास्पद महिलांचा आणि भिकाऱ्यांचा तपास घ्यावा.
- प्रवाशांसाठी हेल्पडेस्क आणि तक्रार नोंदणी सुविधा – प्रवाशांना तक्रारी नोंदवण्यासाठी सोपी सुविधा द्यावी.
स्वारगेट घटनेनंतरही जर योग्य ती उपाययोजना झाली नाही, तर भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे रोहा आगार प्रशासनाने तत्काळ पावले उचलून प्रवाशांचा विश्वास कायम ठेवावा.

Be First to Comment