
खांब-रोहा ( नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी व देवकान्हे ग्रा.पंचायत हद्दीमध्ये ता.२३ पासून उन्नत भारत अभियानास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच रवींद्र मरवडे,मारूती महाराज कोलाटकर,पो.पाटील गणेश महाडिक, वसंत मरवडे, गजानन बामणे, दयाराम मरवडे, सखाराम कचरे, पांडुरंग गोसावी, संतोष भोईर,मंगेश ठाकूर, विश्वनाथ जाधव,मनोज भोईर, जगदीश जाधव,सुभाष माटल,मनोज थिटे,संतोष थिटे आदी पाच गावांतील प्रमुख ग्रामस्थांसह एसजीपीएस गुरू नानक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय मुंबईचे
डॉ.कुलजित कहलोन,डॉ.ज्योतिंदरकुमार चड्डा
डॉ.राजेश्री शेंडगे,प्रो.सुचिता शेट्टी,प्रो.काजी रेहमान,निता मल्लिक,हरदीप सिंग आदींसह महाविद्यालयाचे विद्यार्थी व व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसजीपीएस गुरू नानक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने उन्नत भारत गाव विकास प्रकल्प अंतर्गत तळवली व देवकान्हे या दोन्ही ग्रा.पंचायत मधील तळवली तर्फे अष्टमी,चिल्हे,धानकान्हे,देवकान्हे व बाहे या पाचही गावांतील पायाभूत सुविधा अंतर्गत गावातील रस्ते,लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था,आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा,जंगल संपत्ती, कचरा व्यवस्थापन आदी सुविधांबाबत उन्नत भारत अभियानांतर्गत एसजीपीएस गुरू नानक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय मुंबई यांच्या वतीने गाव विकास प्रकल्प अंतर्गत सर्वेक्षण करून त्यावर ठोस उपाययोजना केल्या जातील व यामधून गावांचा विकास साधला जाईल अशाप्रकारची माहिती डॉ.कुलजित कहलोन यांनी यावेळी दिली.

Be First to Comment