
सचिन देवकर यांचे कलिंगड पोहोचले दुबईला
खांब-रोहा,दि.१(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील बाहे गावचे कृषीनिष्ठ युवा शेतकरी म्हणून सर्वपरिचित असणारे सचिन हरी देवकर यांच्या कलिंगड पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली असून त्यांनी पिकविलेले
कलिंगड थेट दुबईला रवाना झाले आहेत.

शेती क्षेत्रात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणारे सचिन देवकर व त्यांच्या सौ.रूपाली देवकर यांनी या वर्षीच्या शेतीच्या हंगामात गत वर्षाप्रमाणे या ही वर्षी आपल्याच गावातील शेती क्षेत्रात कलिंगड पिकाची शेती करून व विकसित बियाण्याचा वापर करून नवा प्रयोग केला.त्यांच्या या प्रयोगास चांगले यश मिळून कलिंगड पिकाचे उत्पादनही चांगले आले याशिवाय फळेही आकाराने मोठी आली.कलिंगड पिकाचा दर्जा व मोठे फळ आल्याने मुंबई मधील येथील काही कलिंगड फळ विक्रेते व्यापा-यांनी देधकर यांच्या शेतीतील कलिंगडे खरेदी करणे पसंत केले.मुंबईतील व्यापाऱ्यांनी दुबईतील व्यापाऱ्यांशी संपर्क साधले असता दुबईतील व्यापा-यांनाही कलिंगडे पसंतीस उतरल्याने देवकर यांच्या शेतात पिकलेल्या सर्व कलिंगड पिकाला आॅफर देऊन सर्वच पिकलेला माल खरेदी करून देवकर यांच्या कलिंगड फळास थेट दुबईची बाजारपेठ उपलब्ध करून दिली.सचिन देवकर आणि त्यांच्या सौ.रुपाली देवकर यांच्या या शेती क्षेत्रातील नाविण्यपूर्ण प्रयोगाचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

Be First to Comment