

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतले छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीचे दर्शन
रायगड : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हर्षवर्धन सपकाळ यांनी हाती घेताच दिनांक २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडावर जाऊन राजमाता जिजाऊंच्या समाधीला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधीला व नंतर मेघडंबरीतील स्थानापन्न छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी त्यांच्या सोबत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत होते. यावेळी बुलढाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील NCC कॅडेट ने गार्ड ऑफ ऑनर दिला.

काँग्रेस पक्षाची धोरण, तत्व हि हिंदवी स्वराज्यावर आधारित आहेत आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचे संवर्धन करण्याकरीता काँग्रेस पक्ष बांधील आहे असे प्रदेशाध्यक्ष या प्रसंगी म्हणाले.
या वेळी त्यांच्या सोबत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, आर. सि. घरत,मिलिंद पाडगावकर, चंद्रकांत पाटील, नंदाताई म्हात्रे, ॲड. श्रद्धा ठाकूर, सुदाम पाटील, नयना घरत, निखिल डवले, हेमराज म्हात्रे, मार्तंड नाखवा, अफझल चांदले, किरीट पाटील व शेकडोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment