
पत्नीने मुलगा व मित्रांच्या मदतीने पतीचा केला खून ; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
पनवेल दि.२८(संजय कदम): पत्नीने १६ वर्षाच्या मुळाशी दोन मित्रांच्या मादीने पतीचा केला खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विमानतळ सर्विस रोड वरून वहाळ गाव कडे येणाऱ्या खाडीवरील पुलावर अनोळखी इसमाचा मृतदेह पोलीसांना आढळला होता. त्यानुसार उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक देशमुख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू केली होती.
त्या दरम्यान रेश्मा सचिन मोरे आणि तिचा मुलगा हे तिचा पती सचिन मोरे हा कालपासून मिसिंग असल्याबाबतची तक्रार देण्यास पोलीस ठाण्यास आले होते. त्यावेळी तिला अनोळखी मयत इसमाचे फोटो दाखविल्याने तिने ते फोटो पाहून तो तिचा पती सचिन मोरे असल्याचे ओळखले. या महिलेकडे महिलेकडे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी सविस्तर चौकशी केली असता ती असमाधानकारक आणि संदिग्ध उत्तर देत असल्याने तिच्यावर संशय आला. त्यामुळे तिच्या मोबाईलचे सीडीआर त्यांच्या राहत्या घराचे बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज तसेच मृतदेहाच्या शिवविच्छेदन अहवाल यावरून मृत इसमाचा नाक आणि तोंड दाबून खून झाल्याबाबत खात्री झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.

त्यानंतर पुढील तपास केला असता रेश्मा मोरे यांनी तिचा पती सचिन मोरे याच्याकडून मानसिक आणि शारीरीक त्रास देत असल्याने त्यास घटस्फोट देण्यास सांगितले होते. परंतु पतीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने त्यांनी पतीला जिवे ठार मारण्याचे ठरविले. रेश्मा सचिन मोरे (३५ वर्ष) हिने मुलगा (१६ वर्ष) तिचा मित्र रोहित टेमकर आणि रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे यांच्या मदतीने कट रचून रोहित टेमकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या नशेच्या गोळ्या सचिन मोरेला कारल्याच्या ज्यूस मध्ये टाकून प्यायला दिल्या. सचिन मोरे नशेच्या गुंगीमध्ये असताना त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने आरोपी रिक्षाचालक प्रथमेश म्हात्रेच्या रिक्षामध्ये पत्नी, मुलगा आणि सचिन मोरे हे रिक्षात बसून शगुन चौक, उलवे, डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरूळ, कळंबोली, एमजीएम हॉस्पिटल कामोठे, उरण, जेएनपीटी परिसर इत्यादी भागात फिरवून जासई येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रिक्षा थांबवून रेश्मा मोरे हिने सचिन मोरे याचा ओढणीने गळा आवळून खून केला आणि त्याला पुढे एखाद्या वाहनाखाली खाली फेकून देऊन अपघात झाल्याचे दाखवावे असे उद्देशाने पुढे रिक्षा चालवत घेऊन जात होते.
दरम्यान त्याला रिक्षामधुन बाहेर फेकणे शक्य नसल्याने आणि सचिन मिरे याचा परत श्वास सुरू असल्याचे रेश्मा यांच्या लक्षात आल्याने तिने परत त्याचे नाक आणि तोंड हाताने दाबून जिवे ठार मारले तसेच वहाळ खाडीवरील ब्रिज वर मुलगा आणि रिक्षा चालकच्या मदतीने सचिन मोरे याला फेकून दिले. या गुन्ह्यातील मुलगा १६ वर्षाचा असल्याने त्याला बाल न्यायालयासमोर हजर केले आहे. तसेच ०३ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उलवा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने, सपोनि सुरेश खरात, पोउपनि स्वप्निल शेळके, पोउपनि आशुतोष देशमुख, पोहवा तांडेल, पोहवा गोसावी, पोशि परदेशी, पोशि घुगे, पोशि कोठुळे, पोशि रावळ यांनी केली आहे.

Be First to Comment