
धुळे : प्रतिनीधी
महाराष्ट्र राज्य बाल हक्क सरंक्षण द्वारा आयोजित “बालस्नेही पुरस्कार 2024″या पुरस्कारा करीता ‘उत्कृष्ट पोलिस अधिक्षक’या नामाकंणासाठी धुळ्याचे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांची निवड झालेली आहे तशा आशयाचे पत्र अॕड.सुशीबेन शहा अध्यक्षा महाराष्ट्र राज्य बाल हक्क सरक्षंण आयोग यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेले आहे .

सदर पुरस्कार सोहळा यशंवतराव चव्हाण सेंटर जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग नरिमन पाॕईट मुंबई येथे दि.3/3/2025 रोजी दुपारी 1..00वाजता संपन्न होणार आहे ..सदर कार्यक्रम एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच कु.आदिती तटकरे मंत्री महिला व बाल विकास विभाग योगेश कदम राज्यमंत्री गृह (शहरी) श्रीमती मेघना बोर्डीकर राज्यमंत्री महिला व बाल विकास विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .

Be First to Comment