
पेण, ता. २६ (वार्ताहर) : पेण- खोपोली राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी मागच्या काही महिन्यांपासून पेण तालुक्यातील कामार्ली वाकरुळ तेथील रहिवाशांनी हरकत घेतल्यामुळे त्या टप्प्यातील काम अपूर्ण राहिले होते अखेर त्या कामाला राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सुरूवात करण्यात आली आहे मात्र या रुंदणीकरणात येथे दुजाभाव दाखविण्यात येत असून सदर रस्ता सरळ न जाता येथील काही मोजक्या अनाधिकृत घरांना वाचविण्यात येत आहे कामार्ली नाक्यावरील रस्ता हा वेडा वाकडा नव्हता तो सरळ होता त्यामुळे त्याची कटिंग सरळ करण्यात यावी अशी मागणी येथील रहिवासी मयूर वनगे यांनी केली आहे.
या भागातील कामार्ली वाकरूळ ते गागोदे खिंड आरावपर्यंतचा रस्ता दुरावस्थेत होता तिथे काही ठिकाणी वनविभागाचा भाग येत असल्याने येथे रस्त्याची डागडुजी होत नव्हती त्यामुळे अनेकदा येथे अपघात घडत होते अखेर काही ठिकाणी राहिलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली असून वनविभागाची परवानगी सुद्धा येत्या काही दिवसांत येऊन तीथेही काम होणार आहे परंतु कामार्ली वाकरूळ या ठिकाणचा रस्ता वेडा वाकडा न करता सरळ करण्यात यावा याकामी आमची कोणतीही हरकत नाही असे मयूर वनगे यांनी माहिती दिली आहे.

पेण तालुक्याची आमसभा दोन दिवसांपूर्वी आमदार रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार धैर्यशील पाटील तसेच संबंधित विविध खात्याचे अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत झाली त्या ठिकाणी सदर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता कामार्ली वाकरूळ येथील रस्ता योग्य मोजमापात कटिंग करण्यात यावा काही अनाधिकृत घरांना वाचवण्याचा घाट अधिकारी वर्ग घालत आहेत त्याला आमचा विरोध आहे.
मयूर वनगे – रहिवाशी
पेण- खोपोली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चांगले आणि सुसज्ज झाले आहे मात्र कामार्ली वाकरुळ याठिकाणी काही हरकती आल्या होत्या त्या दूर करण्यात आल्या असून कामाला सुरुवात करण्यात आली आहे योग्य पद्धतीनेच काम सुरू आहे तसेच गागोदे खिंड येथील उर्वरित रस्त्याला वनविभागाची लवकरच परवानगी येत असून तो ही रस्ता पुर्णता डांबरीकरण होऊन सुरळीतपणे सुरू होणार आहे.
रविंद्र कदम – अधिकारी राष्ट्रीय महामार्ग
Be First to Comment