

रायगड जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !
रायगड – प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. रायगड जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने एकूण ४३ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. या सर्व ग्रंथप्रदर्शनांना हजारो जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने घेतली.
‘महाशिवरात्री’ला शिवतत्त्व नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी शिवाची उपासना जेवढी अधिक करू, तेवढा उपासकाला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. या अनुषंगाने शिवाच्या उपासनेसह विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती या ग्रंथप्रदर्शनांवर देण्यात आली.

या सर्व ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे विविध मान्यवर जिज्ञासू आणि भाविक यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ आणि सात्विक उत्पादने यांचा लाभ घेतला. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच शिवाच्या उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे यासाठी फलक प्रसिध्दी, सोशल मिडीया आदी माध्यमातूनही सनातन संस्थेच्या वतीने लोकांचे प्रबोधन करण्यात आले. काही ठिकाणी मान्यवरानी ग्रंथ प्रदर्शनाला भेटी दिल्या.
तपोवन बालाजी मंदिर, पनवेल येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला विकासक श्री. बन्सल यांनी भेट दिली तर माजी नगराध्यक्ष श्री. संतोष शृंगारपुरे यांनी पेण येथील ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली तसेच शिवसेना कामोठे शहर प्रमुख श्री.सुनील गोवारी यांनी कामोठे येथील मंदिरातील ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

Be First to Comment