
पनवेल दि.26 प्रतिनिधी
रा.स्व.संघ जनकल्याण समिती व पटवर्धन रुग्णालय पनवेल व डॉ प्रभाकर पटवर्धन यांच्या वर्धापन दिनानिमित्त.सुनील देवधर यांचे विकसित भारत व पूर्वोत्तर भारत या विषयावर व्याख्यान आगरी समाज हॉल येथे शनिवारी संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात. सुनीलजी देवधर व प्रकल्प समिती पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते डाॅ.प्रभाकर पटवर्धन यांच्या प्रतिमेचे पुजान व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर धन्वंतरी स्तवन झाले. रुग्णालय व जनकल्याण समितीचा माहितीपट दाखविण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत प्रकल्प पालक व जनकल्याण समिती प्रांत कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्षा डाॅ.किर्ती समुद्र यांनी केले. महाराष्ट्रात चालणाऱ्या जनकल्याण समितीच्या प्रकल्पांची माहिती .प्रदिपजी पराडकर यांनी करुन दिली. रुग्णालयातील .राकेश पाटील(भांडार विभाग) .दिलिप पाटील (शस्त्रक्रिया विभाग) . वैभव जाधव ( क्ष किरण विभाग) .साक्षी साळुंखे (सोनोग्राफी विभाग) यांना उदयराव टिळक कुटुंबियांन तर्फे श्रीमती नीलाताई पटवर्धन स्मृती पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल देण्यात आला.
रुग्णालय जनसंपर्क अधिकरी . प्रसन्न खेडकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. सुनीलजीं यांनी गेल्या दहा वर्षात भारतात झालेले बदल व ईशान्य भारतात हिंदूंवर झालेले आत्याचार, संघ प्रचारकांवर झालेले हल्ले, त्यांचे हौतात्म्य , त्यांनी न डगमगता केलेले काम व त्यामुळे आज झालेले परिवर्तन या विषयी उदाहरण देवून विषयाची मांडणी केली. भारताला परम वैभवाप्रत नेण्यासाठी प्रत्येकाने सर्किय होण्याची गरज आहे असे आवाहन केले.
श्री.पंकज पात्रीकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संस्थेच्या सहकार्यवाहिका सौ.अनुराधा ओगले यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.किर्ती समुद्र, उपाध्यक्ष डाॅ.ययाती गांधी, कार्यवाह .राजीव समेळ,जनकल्याण समिती कोषाध्यक्ष .प्रदिप पराडकर,संस्था पदाधिकारी तसेच पनवेलकर नागरिक उपस्थित होते.





Be First to Comment