
पनवेल, दि.24 (संजय कदम) ः कामोठे परिसरात चोरी झालेल्या चार चाकी वाहनांपैकी 6 वाहने हस्तगत करण्यात आली असून या प्रकरणी तीन जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी संदर्भातील गुन्हे दाखल होताच वपोनि विमल बिडवे यांचे मार्गदर्शनाखाली कामोठे पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.उप.नि किरण राऊत, पो. हवा संजय झोळ, पो.ना सचिन ठोंबरे, पो.शि प्रमोद कोकाटे, नितीन गायकवाड आदींनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपींची माहिती काढून त्यामध्ये मोहम्मद शाहिद मिर्झा बेग, वय -41, मोहम्मद फैज अकबर शेख, वय -48, अजीज रशीद खान, वय -48 यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन स्वीफ्ट व एक इर्टीगा ताब्यात घेण्यात आली असून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर कामोठे, बोरीवली, वागळे पोलीस ठाणे आदी ठिकाणी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यांच्या अटकेमुळे अजूनही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




Be First to Comment