
विराट कोहली तुझा खेळ विराट
धावा काढण्यात तू खूप एक्सपर्ट
चौके-छक्यांची करुनी बरसात
निपुण बॉलर्सचीही लावतोस वाट…
प्रत्येक सामना जिद्दीने खेळतोस
टीम जिंकविण्याचा तुझा ध्यास
बॅटिंग – फिल्डिंगचा पूर्ण अभ्यास
ऑल राऊंडर ‘विराट’ तू झकास…
शतक-अर्धशतक जणू तुझ्या हाती
टीम सोबत जोडलीस छान नाती
‘विराट कोहली’ तू हिरा भारताचा
खेळ पाहुनी गर्वाने फुलते छाती…
मैदानात उतरतोस तू सामना वीर
तुझ्या बॅटिंग ने धावांना येतो पुर
खेळत रहा असाच ‘विराट’ जिद्दीने
‘इंडिया-इंडिया’ गुंजत राहोत सूर…
‘इंडिया-इंडिया’ गुंजत राहतील सूर.. !!
अरुण द. म्हात्रे. (जासई- उरण- रायगड) मो. 9987992519.




Be First to Comment