
मुलुंड प्रतिनीधी : सतिश वि.पाटील
आरोग्य मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेनंतर आरोग्य मित्रांनी 18 फेब्रुवारीपासून सुरू केलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात 2014 पासून कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांना अल्प वेतनावर काम करावे लागते, त्यांना कायद्यानुसार किमान वेतनही दिले जात नाही, तसेच मूळ वेतन, महागाई भत्ता, बोनस कायद्यात नमूद केल्यापेक्षा कमी दिला जातो. 10 ते 14 वर्षे काम करूनही वेतन वाढ दिली नाही म्हणून राज्यातील आरोग्य मित्रांनी संप सुरू केला होता.
संपामध्ये आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत असलेल्या दीड हजार आरोग्य मित्र सहभागीत झाले आहेत.
यासंदर्भात ७ फेब्रुवारी रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीइओ श्री अण्णासाहेब चव्हाण यांनी टीपीए व संघटनेचे संयुक्त बैठक बोलावून सकारात्मक निर्णय करण्याचे निर्देश यांना दिले होते.

त्यानंतर टीपीए यांनी सुमारे दोन ते तीन हजार रुपये वाढीचा प्रस्ताव संघटनेला दिला तसेच महागाई भत्ता व रजांचे सुविधा लागू करण्याबद्दलचे मान्य केले . यावर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीइओ अण्णासाहेब चव्हाण यांनी किमान वेतन कायद्यानुसार मूळ वेतन, महागाई भत्ता, रजा देण्याचे निर्देश यांना दिले आहेत.
तसेच वेतन वाढ व अन्य मागण्याबाबत अधिवेशन काळामध्ये बैठक बोलावून मार्ग काढण्याचे आश्वासन आरोग्य मंत्री माननीय प्रकाश अबिटकर आणि विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी.एल कराड यांना आज दिले. त्यामुळे संघटनेने संप स्थगित करून कामावर रुजू होण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आरोग्य मित्र कामावर रुजू होत आहेत.




Be First to Comment