
तृप्ती भोईर : उरण
जानेवारी २०२४ रोजी नेरुळ उरण हि रेल्वे सेवा चालू झाल्यापासून उरण व उरणमधील इतर गावातील नागरिक, विद्यार्थी चाकरमानी , कॉलेज विद्यार्थी, रुग्णांसाठी सोयीचे झाले आहे. हजारोंच्या संख्येने दररोज रेल्वेप्रवास प्रवासी करत आहेत.
या नंतर गेल्या महिन्यात ऑईल टॅंकर वॅगन सुध्दा चालू झाली आहे. या ऑईल टॅंकर वॅगन साठी एक रुळ राखीव ठेवला आहे. या रुळारुन या वॅगन ची येजा चालू असते. स्टेशनच्या बाहेरील रुळावरून या ऑईल टॅंकर वॅगन ची फेरी होत असते.
प्रवाशांना जाण्यासाठी उरण व द्रोणागिरी रेल्वे स्थानकावर भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु रेल्वे पकडण्यासाठी घाईने मोटरमन च्या दिशेने बाहेर पडून घाईघाईने रेल्वे ट्रॅक ओलांडून बरेच जण रेल्वे पकडतात.
घाईघाईने मोटरमनच्या दिशेने बाहेर पडताना रेल्वे ट्रॅक ओलांडताना जो मोकळा रेल्वे ट्रॅक आहे त्या ट्रॅक वरुन ऑईल टॅंकरची फेरी चालू असते. आणि नेमके दोन दिवसापूर्वी द्रोणागिरी रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे आली असताना हा ऑईल टॅंकर वॅगन चा रस्ता वॅगन आलेली एका मुलीने पाहिली नाही आणि तो रस्ता मोकळा आहे समजून रेल्वे ट्रॅक ओलांडताना ऑईल टॅंकर वॅगन चा तीला धक्का लागून ती खाली पडली. पण सुदैवाने तीचा जीव वाचला. त्यावेळी वॅगन चा मोटरमन जोराने हॉर्न वाजवित होता. पण त्या मुलीचे लक्षच नव्हते ती रेल्वे पकडण्यासाठी घाईत होती. त्यावेळी मोटरमन ने समयसूचकता दाखवून इमरजन्सी ब्रेक लावल्याने पुढील अनर्थ टळला.
यासाठी रेल्वे प्रवाशांनी भुयारी मार्गाचा वापर करून सुरक्षित प्रवास केला तर अपघात होणार नाही. याकरिता दक्षता घ्यावी.




Be First to Comment