मान्यवरांच्या मांदियाळी मध्ये रंगणार श्री दत्त जयंती सोहळा
दत्त जयंती जवळ आली की पनवेल पंचक्रोशीतील नागरिकांच्या मनात खीडुकपाडा येथील श्री दत्त जयंती सोहळा रुंजी घालू लागतो. शेतकरी कामगार पक्षाचे वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या वतीने आयोजित श्री दत्त जयंती सोहळा म्हणजे तमाम दत्तभक्तांना एक भक्तीपूर्ण अनुभवाची पूर्ण प्रचिती असते. यंदाचे वर्षी याच दत्त जयंती सोहळ्याचे विसावे वर्ष आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रभुदास भोईर यांच्या वतीने आयोजित सोहळ्यामध्ये ग्रामस्थ मंडळ खीडुकपाडा आणि टीम अण्णा अशा साऱ्यांचे सहकार्य आणि परिश्रम पाहायला मिळतात. दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकिर्तनकार छोटे इंदुरीकर म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले ह भ प माऊली महाराज काकडे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी सात वाजता श्री दत्त महाराजांचा अभिषेक संपन्न होणार आहे. त्यानंतर होम हवन होईल व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल. महाप्रसादाने सर्व दत्त भक्तांना अन्नदान सेवा संपन्न झाल्यावर दुपारी एक वाजता भजन तर संध्याकाळी चार वाजता हरीपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
भक्तिमय वातावरणामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू असताना नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिर आणि औषध वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच प्रभुदास भोईर यांच्या वतीने दरवर्षी प्रचलित मराठी नाटक आणण्याची परंपरा याही वर्षी अबाधित ठेवण्यात आली आहे. विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, प्रियदर्शन जाधव अशी तगडी स्टारकास्ट असणारे कुरर हे मराठी नाटक रात्री आठ वाजता दाखवण्यात येईल.
या दत्त जयंती सोहळ्याला तमाम राजकीय प्रभूती आपापल्या राजकीय भूमिका दूर ठेवून सहभागी होत असतात. प्रशासकीय अधिकारी, पोलीस बांधव यांची देखील लक्षणीय उपस्थिती लाभते.माजी आमदार बाळाराम पाटील,जे एम म्हात्रे, एड आस्वाद पाटील उर्फ पप्पू शेठ,प्रितम म्हात्रे,काशिनाथ पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, भावनाताई घाणेकर, बाळासाहेब पाटील, विक्रांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे अशा मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे.




Be First to Comment