सात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
सिटी बेल/ खोपोली
रविवार 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याचे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कि.मी. 40:00 च्या दरम्यान वैभव ट्रॅव्हल्सची बस नं क्र. MH-09-GJ-9630 वरील चालक शिरीष राजाराम ढेकळे वय -43 वर्षे रा. कराड हे मुंबईकडून पुणेकडे गाडी घेऊन जात असताना ट्रेलर क्र. RJ-14 -JU – 9745 च्या मागील बाजूस धडकली. त्यामुळे बस मध्ये डाव्या बाजूला बसलेल्या सहयोगी बस चालक राज गावडे – वय 40 वर्षे रा. सांगली याचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जगीच मृत्यू झाला. बस मधील जखमी शैलेश शेटके, प्रदीप शिवाजी चव्हाण, सुधीर भागवत, राहुल भागवत, रोहित भोसले या पाच जखमींना एम जी एम येथे तर स्नेहा मेहता,जितेश चतुर्वेदी या दोन जणांना लोकमान्य टिळक हॉस्पिटल – पुणे येथे पुढील उपचाराकरता पाठविण्यात आले आहे.
आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी, डेल्टा फोर्सचे जवान, महाराष्ट्र सुरक्षा बल चे जवान, लोकमान्य हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य यांच्या संयुक्त प्रयत्नाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.
मृत सहयोगी बस चालकाचे बाबत खोपोली नगर पालिका रुग्णालयात, खोपोली पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद झाली आहे.







Be First to Comment