सिद्धांत रायफल अँड पिस्तल क्लब चा स्पर्धेमध्ये राहिला दबदबा
पनवेल / प्रतिनिधी.
66 वी राष्ट्रीय रायफल नेमबाजी स्पर्धा 2023 हि दिल्ली येथे 19नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान तर भोपाळ येथे दिनांक 25नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2023 दरम्यान पार पडली.सिद्धांत रायफल आणि पिस्तल क्लब रायगड यांचे खणखणीत वर्चस्व या स्पर्धेत दिसून आले. ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र रायफल संघटने तर्फे डबल ट्रॅप शॉटगन ह्या खेळ प्रकारात कुमारी अवनी कोळी दिघोडे उरण, साईम देशमुख महाड, मुसा काझी गोरेगाव व किरण माळी, काणसाई अंबरनाथ यांनी 50 मिटर रायफल प्रोन मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.
डबल ट्रॅप शॉटगन मध्ये अवनी कोळी हिने महिला सांघिक सिल्वर मेडल मिळवत विख्यात नेमबाज होण्याचा बहुमान पटकावला. रायगड नवी मुंबई क्षेत्रातून पहिली डबल ट्रॅप शूटर होण्याचा बहुमान तिने मिळविला. मुसा काझी व साईम देशमुख ह्यांचे अत्यंत थोड्या फरकाने विख्यात नेमबाज होण्याचे स्वप्न भंग पावलं.किरण माळी ह्याने 50 मीटर प्रोन नेमबाजी मध्ये विख्यात नेमबाज होण्याचा सन्मान पहिल्याच प्रयत्नात पटकावला.पिस्टल शूटिंग स्पर्धा हि भोपाळ येथे झाली. ह्या स्पर्धेत रायगड मधील सिद्धांत रायफल क्लबचे नेमबाज रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज किशन खारके,नेरे जयंता साळवे मुंबई,रिथिक नट्टराजन, अमेय कोळी, गौरव ठाकूर ह्यांनी महाराष्ट्र रायफल संघटनाचे प्रतिनिधित्व केले होते त्यामध्ये किशन खारके, जयंता साळवे, रिथिक यांनी विख्यात नेमबाज होण्याचा मान मिळविला त्याबद्दल सिद्धांत रायफल क्लब रायगड चे स्वतः सेक्रेटरी प्रशिक्षक किशन, खारके,प्रशिक्षक अलंकार कोळी, इंडियन मॉडेल स्कूल उलवे सर्व संचालक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




Be First to Comment