Press "Enter" to skip to content

उत्कर्ष महिला मंडळ संचलित बालवाडीला वुई क्लबची चाळीस खुर्च्यांची भेट



सिटी बेल /पनवेल


          नवीन पनवेल येथील उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या बालवाडी उपक्रमाला वुई क्लब ऑफ नवीन पनवेल स्टील टाऊन यांच्या वतीने ४० खुर्च्या भेट देण्यात आल्या.शुक्रवारी सकाळी संपन्न झालेल्या या छोटेखानी सोहळ्याला दोन्ही सेवाभावी संस्थांच्या पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती.
            उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा,माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा ताई पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच वुई क्लब ऑफ नवीन पनवेल स्टील टाऊन यांच्या वतीने ४० खुर्च्या भेट दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.१९८५ साली स्थापना झालेल्या उत्कर्ष महिला मंडळाने १९९० च्या सुमारास बालवाडी उपक्रम सुरू केला. आजही अत्यंत नेटाने भावी पिढी सक्षम बनविण्यासाठी त्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे काम उत्कर्ष बालवाडी करत आहे.
           वुई क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंजू जैन यांनी त्यांची संस्था करत असलेल्या अनेक सेवाभावी उपक्रमाबद्दल उपस्थितांना अवगत केले. अडीच ते साडेचार वर्ष वयोगटातील मुले या बालवाडी मध्ये शिक्षण घेत असतात. अत्यंत उत्तम प्रतीच्या नीलकमल कंपनीच्या बेबी चेअर्स येथील विद्यार्थ्यांना निश्चितच सोयीच्या पडतील.वुई क्लब या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. महिला सबळीकरण आणि सुदृढ समाज निर्मिती ही दोन प्रमुख ध्येय डोळ्यापुढे ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, निराधार गृह अशा ठिकाणी उपयोगी पडतील अशा वस्तूंचे वाटप या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांच्या संस्था तसेच ग्रामीण विभागातील, दुर्गम विभागातील वंचित दुर्लक्षित घटकांना देखील ही संस्था सरळ हस्ते मदत करत असते. दृष्टिहीनांना दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी देखील वुई क्लबचा हिरीरीने सहभाग असतो. तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य देखील ही संस्था करत आहे.
      या खुर्ची वाटप कार्यक्रमाला वुई क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट मंजू जैन, पनवेल क्लब प्रेसिडेंट मेघा जैन, उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा ताई पाटील, सचिव रसिका फाटक, खजिनदार स्नेहल पोळ वुई क्लबच्या सदस्या प्रिया सबनीस, मनीषा ठाकरे नीलम इंदुलकर नलिनी चव्हाण अनिता विभांदिक तसेच उत्कर्ष महिला मंडळाच्या सदस्य ज्योती माने, नम्रता जाधव, अश्विनी पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.