वाशी/ वार्ताहर २ डिसेंबर.
वाशी येथे बिल्डर्स असोशिएशन ऑफ नवी मुंबई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जासम क्रेडाई एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोला रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी नुकतीच भेट दिली. नवी मुंबई मध्ये सध्या सिडकोच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आकार घेत आहेत, त्यामुळे नवी मुंबई मधील घरे येत्या काळात मुंबईच्या स्क्वेअर फूट दराने विकली जातील. अलीकडेच मेट्रोचे उद्घाटन झाले आहे, आगामी काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होतोय, न्हावा शिवडी सागरी सेतू सुरु होतोय त्यामुळे नवी मुंबईसोबत कनेक्टीव्हीटी वाढत आहे. बिल्डर उद्योगामध्ये नवीन पिढी उतरली आहे त्यामुळे अन्य विकसनशील देशातील सुविधांप्रमाणे नवी मुंबईत सुविधा देण्याच्या नवीन पिढीचा प्रयत्न आहे. अतिशय अत्याधुनिक स्टॉल्स या एक्झिबिशन मध्ये आहेत याचा फायदा नवी मुंबईकरांना नक्कीच होईल. उच्चशिक्षित तरुण बिल्डरांमुळे नवी मुंबईच्या सौंदर्यात चार चांद लागले आहेत व नवी मुंबईच्या प्रगतीमध्ये बिल्डरांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी केले.
Be First to Comment