पनवेल / प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू हे २ नोव्हेंबर रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्यानें विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी पोदी येथील एस पी मोरे फाउंडेशनच्या रुग्णसेवा केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सिद्धिविनायक सोशल संस्था आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.माजी आमदार बाळाराम पाटील,माजी नगराध्यक्ष तथा सुप्रसिद्ध उद्योजक जे एम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.
शेकाप जिल्हा चिटणीस तथा माजी नगरसेवक गणेश चंद्रकांत कडू नोव्हेंबर महिन्याच्या २ तारखेला वयाची ५० वर्षे पूर्ण करून ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी च्या भव्य क्रीडांगणावर अभिष्टचिंतन सोहळा रंगणार आहे.त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. पोदी येथे आयोजित रक्तदान शिबिरासाठी घाटकोपर येथील समर्पण ब्लड बँक यांच्यावतीने अप्रतिम नियोजन करण्यात आले होते. ५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रकाच्या सोबतच स्मार्ट कार्ड देण्यात आले. या कार्डमध्ये रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानाची नोंद ठेवण्याची सोय असून त्याचा रक्तदात्यांना गरज पडल्यास लाभ देखील घेता येतो. प्रत्येक रक्तदात्याचा बारकोड च्या माध्यमातून एक रजिस्ट्रेशन नंबर बनवला जातो त्यामुळे आगामी काळात त्या रक्तदात्याची सगळी नोंद चोख ठेवली जाते.
गणेश कडू यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने आयोजित रक्तदान शिबिराला आमदार बाळाराम पाटील,जे एम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,माजी नगरसेवक गोपाळ भगत,एस पी मोरे फाउंडेशनचे चेअरमन सतीश मोरे, किरण दाभणे,आयपीए चे महाराष्ट्र राज्य खजिनदार संतोष घोडिंदे, कौन्सिल मेंबर उमेश तिवारी,सेक्रेटरी नितिन मनियार,माजी नगरसेवक सुनील मोरे, पुरुषोत्तम (नाना) भुजबळ,किशोर लोंढे,पुरुषोत्तम खानविलकर,सचिन कुदळे, सतिश ढवळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरता सिद्धिविनायक सोशल संस्थेचे संदीप गुडेकर,अनिकेत गुढेकर,संजय पुजारी,मंदार भुजबळ,गणेश भुजबळ,आशीष दरेकर, माँटी,रोहन लोखंडे,रवी मराठे,राजेश खंडवी,सुनील पवार,हार्दिक लोंढे यांनी अथक परिश्रम घेतले.
Be First to Comment