अशोक पंडित यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यावर केली मात
पनवेल / प्रतिनिधी
नुकत्याच मुंबई मधील वरळी शुटींग रेंज वर महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा पार पडली.पनवेलचे राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज किसन खारके यांनी वैयक्तिक शुटींग प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.विशेष म्हणजे सुप्रसिद्ध नेमबाज अशोक पंडित यांना तब्बल २३ गुणांच्या फरकाने त्यांनी मात दिल्याने किसन यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे.
९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या.सदरची स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते.यंदाचे स्पर्धेचे ३८ वे वर्ष होते.५० मिटर फ्री पिस्तूल या प्रकारात किसन खारके यांनी सुवर्ण पदक पटकावले.कॉमन वेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळविणारे अशोक पंडित यांचे तगडे आव्हान मोडत किसन यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्वतः अशोक पंडीत सर यांनी व महाराष्ट्र रायफल संघटनेच्या सेक्रेटरी शिला कानुंगो यांनी अभिनंदन करुन किसन यांना शुभेच्छा दिल्या.सध्या किशन खारके है उरणच्या चिरनेर येथील कै.मधुकर केणी मेमोरियल शूटिंग रेंज आणि ऊलवे नोड मधील इंडियन माॅडेल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील सिद्धांत रायफल क्लब येथे प्रशिक्षक अलंकार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजी चे प्रशिक्षण घेत आहेत. किसन खारके सध्या उदयोन्मुख आणि नवोदित खेळाडूंना ते नेमबाजीचे प्रशिक्षण देत आहेत.
Be First to Comment