IOTL ( जसखार ) येथील कामगारांना ६००० रुपये पगार वाढ
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची वाटचाल दिवसेंदिवस जोमाने सुरु आहे. या कंपनीत या पूर्वीच्या संघटना कामगारांना न्याय न देऊ शकल्यामुळे या कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे. संघटनेने यशस्वी चर्चा करून कामगारांना ६ हजार रुपये पगारवाढ करण्याचा करार करण्यास भाग पाडले.सदर द्विपक्षीय करार कामगार आयुक्त कार्यालय सायन मुंबई येथे संपन्न झाला. या करारानुसार पगारवाढी बरोबरच कामगारांना सर्व सोई सुविधा देण्याचे देखील कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे. पगारवाढीच्या फरकापोटी कामगारांना प्रत्येकी ४५ ते ५० हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे कामगारांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होणार आहे.यानंतर कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले व या पुढेही आमच्या पाठीशी उभे रहाल अशी अपेक्षा व्यक्त केली. फक्त संघटनेचे बोर्ड न लावता कामगारांना न्याय मिळवून देणे हेच संघटनेचे खरे कर्तव्य आहे असे प्रतिपादन यावेळी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले .
Be First to Comment